मंगळवेढा:-
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सातत्याने मंगळवेढ्याच्या विकास कामावर काम करत आहे व मंगळवेढ्यातील विविध प्रश्नांवर नगरपालिकेस जाब विचारत आहे.त्याच अनुषंगाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने व शहराध्यक्ष राजवीर हजारे शहरातील विविध मागण्यासाठी पत्र देऊन विनंती केली मंगळवेढा शहरात मनसेने केलेली पहिली मागणी मंगळवेढा शहराच्या सौंदर्याच्या दृष्टिकोनातून व संतभूमी म्हणून ओळखले जाणाऱ्या मंगळवेढा शहराला एक दोन्ही बाजूनी मंगळवेढाच्या मेन रस्त्यास पंढरपूर मंगळवेढा -विजापूर रोड वरती भव्य असं प्रवेशद्वार उभा करण्यात यावं अश्या मागणीचे पत्र देण्यात आले.
दुसरी मागणी हजारे गल्ली येथील मुरलीधर चौक येथे गड किल्ले प्रमाणे प्रवेशद्वार कमान करण्यात यावी याचं कारण असं शहरात वर्षातून विविध वार्षिक सण सांस्कृतिक कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणात या चौकात होतात या कमानीमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल व मुरलीधर चौक येथील शोभा पण वाढेल असे त्या मागणी मध्ये नमूद करण्यात आले.
तिसरी मागणी खोमनाळ नाका येथील आपला दवाखाना येथील पाठीमागच्या मोकळ्या जागेत आधुनिक पद्धतीची व्यायाम शाळा उभारणे या धावपळीच्या युगात आरोग्याचे विविध प्रश्न उद्भवत आहेत अनेक युवक-युवती वयोवृद्ध व आरोग्य प्रेमी यांना खाजगी व्यायाम शाळेत जावे लागत असून सर्वसामान्यांना तो खर्च परवडत नाही.
त्याच अनुषंगाने मनसेने केलेली ही मागणी चौथी मागणी हजारे गल्ली येथील खोमनाळ नाका महिला व पुरुष स्वच्छतागृह नव्याने बांधण्यात यावे कारण तसं पाहिलं गेलं तर पूर्वी या स्वच्छतागृहाचा शंभर टक्के वापर नागरिकांकडून होत असत पण आता प्रत्येक नागरिकांच्या घरी स्वच्छतागृह झाले आहेत त्यामुळे जवळजवळ आता असलेल्या स्वच्छतागृहाचा वापर फक्त 20 टक्केच होत आहे व पूर्वी बांधलेली स्वच्छतागृह हे खूप सुटसुटीत बांधले गेले असल्यामुळे तेथील जागेचा वापर जास्त झाला असून ते आता आधुनिक पद्धतीचं स्वच्छतागृह बांधण्यात यावं कारण शिल्लक राहिलेल्या जागेत आपणास इथे मुलांना खेळण्यासाठी गार्डन करण्यात येईल व करू शकेल अशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहे त्यामुळे आपण थोडीशी पाहणी करून यावर निर्णय घ्यावा अशी विनंती मनसेने शिव साहेब नगरपरिषद यांना केली आहे आणि आता तसं पाहिलं ते स्वच्छतागृह जुने झाले असून त्यातील भांडे फुटलेले एकदम खराब झाले असून वापरण्यात येणाऱ्या निम्मे पाणी संडास टाकली जाण्याऐवजी लगतच्या भिंतीमध्ये मोडते सर्व भिंतीचा ओलावा निर्माण झाला असून पडण्याची शक्यता आहे दरवाजे मुरकुरे झाले असून त्याचा उपयोग होत नाही तसेच दैनंदिन स्वच्छतेच्या अभावामुळे दुर्गंधी अधिकच पसरत आहे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी हजारे गल्ली खोमनाळ नाका येतील महिला व स्वच्छतागृह लवकरात लवकर नवीन बांधण्यात येऊन ते साठे नगर येथील मंगळवेढ्यातील पहिले स्वच्छतागृह उत्तम बांधण्यात आले असून त्याच्यासारखेच हजारे गल्ली येथील स्वच्छतागृह बांधण्यात यावे ही मागणी असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे पाचवी मागणी मंगळवेढ्यात येईल प्रत्येक गल्ली व चौकामध्ये वयोवृत्त नागरिकास बसण्यास लोखंडी बेंच व वाकडे याची सोय करण्यात यावी मंगळवेढा शहरांमध्ये अनेक नागरिक मॉर्निंग व इव्हिनिंग व करीत घराबाहेर पडतात तसेच स्पर्धा होऊन आलेल्या नागरिकांना विसावा मिळण्याकरिता समाधी दर्शन आलेल्या नागरिकांना बसण्याकरिता शहरात विसाव्याची सोय नाही तरी मंगळवेढ्यातील प्रत्येक गल्ली व चौकात मध्ये सर्व नागरिक येणारे वारकरी वयोवृद्ध बसण्यास संपूर्ण शहरा करता अंदाजे 100 नग लोखंडे लोखंडी बेंच याचे नितांत गरज आहे या सर्व मागण्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष राजवीर हजारे यांच्या पत्राद्वारे केली आहे तरी उपस्थित देवदत्त पवार अमोल मोरे बबलू हजारे जय हजारे उपस्थित होते.