सोलापूर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना मिळाला या नेत्याचा पाठिंबा,तर राजकीय वर्तुळात या चर्चांना उधान. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, १९ एप्रिल, २०२४

सोलापूर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना मिळाला या नेत्याचा पाठिंबा,तर राजकीय वर्तुळात या चर्चांना उधान.


प्रतिनिधी:-

सोलापूर लोकसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना भगीरथ भालके यांचा पाठिंबा मिळाला आहे.


भगीरथ भालके यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे महायुतीचे उमेदवार राम यांच्या विरोधातील असणाऱ्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचे पारडे जड झाले असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.


भगीरथ भालके हे बी.आर.एस.पक्षाचे नेते असून त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.


भगीरथ भालके यांनी प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिल्यामुळे प्रणिती शिंदे यांना मंगळवेढा-पंढरपूर मतदार संघमधून मोठ्ठ्या प्रमाणात लीड भेटणार असल्याची चर्चा सध्या मोठ्ठ्या प्रमाणात सुरू आहे.


मंगळवेढा-पंढरपूर येथे झालेल्या पोट निवडणुकीमध्ये भागीरथ भालके यांना एक लाख पाच हजार मते मिळाली होती.


सध्या भगीरथ भालके यांनी प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिल्यामुळे प्रणिती शिंदे यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.


test banner