मंगळवेढा:-
महाराष्ट्रामध्ये सध्या दुष्काळजन्य परिस्थिती असून उजनी धरण मायनस मध्ये गेलेले आहे.तरी सर्वांनी पाण्याची बचत करावी यासाठी मंगळवेढा शहरात ज्येष्ठ नागरिक संघ,वारी परिवार,ढगे डिजिटल व इनरव्हील क्लब यांच्या वतीने शहरांमध्ये रॅली काढण्यात आली.
यामध्ये महिन्यातून एकदाच पाणी तशी वेळ आणू नका कोणी,वाहतोय नळ लक्ष द्या जरा भरून झालं पाणी तोटी बंद करा,तो दिवस दूर नसेल रेशनच्या यादीत पाणी असेल अशा वेगवेगळ्या घोषणा देत शहरातील विविध भागातून रॅली काढण्यात आली.
शहरामध्ये ज्या भागांमध्ये नळाला पाणी येते त्या भागामध्ये जाऊन पाण्याचे महत्त्व सांगून नागरिकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच प्रबोधनात्मक पत्रके वाटप करण्यात येणार आहेत.
सदर उपक्रमामध्ये दत्तात्रय जमदाडे,विलास आवताडे,दत्तात्रय भोसले,प्रकाश स्वामी,शिवाजी सोमदळे,श्रीधर भोसले,सिद्धेश्वर गायकवाड,नामदेव पोळ,महादेव माने,दिलीप कोष्टी, वसंतराव गुंड,पोपट महामोरे,मेजर गोपीनाथ माळी,लहू ढगे,अरुण गुंगे,अतुल इंगळे,सतीश दत्तू आदींनी सहभाग नोंदवला.