विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मातोश्री वृद्धाश्रम येथे अन्नदान. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, १२ एप्रिल, २०२४

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मातोश्री वृद्धाश्रम येथे अन्नदान.


प्रतिनिधी:-

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे वडीलधाऱ्या व्यक्तींना मिष्ठान भोजन देऊन अन्नदान करण्यात आले.


सुरुवातीला शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिवा तेजस्विनी सुजित कदम यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर त्यांच्या शुभ हस्ते वृद्धाश्रम येथील वृद्ध माता -पित्यांना अन्नदान करण्यात आले. 


सदर प्रसंगी बोलताना तेजस्विनी कदम यांनी भगवंत इतर शोधण्याची गरज नाही ते आई -वडिलांच्या सेवेतच आहेत आणि याच सेवेच्या जोरावरती भक्त पुंडलिकांनी देवाला आपल्या घरापर्यंत खेचण्याची किमया करून दाखविली होती.


त्यामुळे आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानावे असे सांगितले खरोखरच असे सामाजिक उपक्रम राबवून आंबेडकरांच्या विचारांची खरी जयंती साजरी केल्याबद्दल मंडळांचे अध्यक्ष अजय गाडे व सर्व पदाधिकारी यांचे कौतुक केले.


सदर कार्यक्रमाच्याप्रसंगी ज्योती ननवरे,वर्षा गोडसे ,राधिका भगत , व इतर अनेक मान्यवर व मंडळाचे अध्यक्ष अजय गाडे तसेच अनेक पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.


test banner