मनसेचे शहराध्यक्ष राजवीर हजारे यांच्या मागणीला यश आता होणार मंगळवेढा नगरपालिकेच्या समोरील इंग्रजी पाटी होणार मराठीत. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, १२ एप्रिल, २०२४

मनसेचे शहराध्यक्ष राजवीर हजारे यांच्या मागणीला यश आता होणार मंगळवेढा नगरपालिकेच्या समोरील इंग्रजी पाटी होणार मराठीत.


मंगळवेढा:-

मंगळवेढा नगरपालिकेच्या समोरील "आय लव मंगळवेढा"हे इंग्रजीत असून ते आता नव्याने "आपला मंगळवेढा"असे करण्यात येणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवेढा शहर यांच्या वतीने 9.10.2023 रोजी मंगळवेढा नगरपरिषदे समोर असलेल्या "आय लव मंगळवेढा" असे मोठ्या अक्षरात इंग्रजी लिहिलेलं पाटी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ते तशाच पद्धतीचं मोठं नाव मराठीत "आय लव मंगळवेढा"असं करण्यात यावं किंवा "आपला मंगळवेढा" असं करण्यात यावं अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवेढा शहराच्या वतीने एक पत्र देण्यात आलं होतं.


त्यानंतर सातत्याने राजवीर हजारे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून सुद्धा पाठपुरावा करून व सर्व मंगळवेढा शहरातील व तालुक्यातील आणि  विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने पाठपुरावा होत होता.


नंतर इंग्रजी पाटी काढायची का ठेवायची यावर चर्चा रंगत होती त्यानंतर नगरपालिकेच्या सी.ओ. साहेबांशी चर्चा केल्यानंतर सी.ओ. साहेबांना आम्ही विनंती केली की मराठी पाटी इंग्रजी पाठीच्या वरती मोठ्या अक्षरात करा इंग्रजी पाटी जशी आहे तशी राहू द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नगरपालिकेचे कोणतेही नुकसान करायचं नाही त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आत्ताची जी इंग्रजी पाटी आहे ती तशीच राहून त्यावरती मोठ्या अक्षरात त्याच्यापेक्षाही मोठ्या आक्षरमध्ये आपला मंगळवेढा असं करण्यात यावं.


 या चर्चेनंतर साहेबांनी मंगळवेढा नगरपरिषदेचे सी ओ मा.श्री चरण कोल्हे साहेब यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवेढा शहर यांच्या वतीने देण्यात आलेल पत्र त्या पत्रानुसार लगेच ठराव मंजूर करण्यात आला व आम्हाला तसं ठराव मंजुरीच पत्रही देण्यात आलं.


त्यामुळे आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक माननीय श्री चरण कोल्हे साहेबांचं मनःपूर्वक आभार मानतो व हे काम लवकरात लवकर करण्यात यावं अशी कळकळीची विनंती मनसेकडून केली त्यानंतर त्यांनी आचारसंहिता संपल्यानंतर आपण ते काम करू असा आश्वासन दिले आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मंगळवेढ्यात जिथे कुठे दुकानावरील किंवा शासकीय कार्यावरील इंग्रजी पाट्या असतील तिथे लवकरात लवकर मराठी अक्षरातील पाट्या दिसल्या पाहिजेत अशी सूचना आम्ही नगरपालिकेला केली असून जर कुठे इथून पुढे दुकानावर किंवा सरकारी कोणतंही कार्यालय असो तिथे मराठी पाटी अनिवार्य असेल तसे नाही झाले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी असे पत्रही वारंवार देण्यात आलेला आहे.


ग्रामपंचायत हद्दीत पण दुकानाला चोखामेळा नगर व दामाजी नगर ग्रामपंचायत येथे पण आपण मराठी पाटी साठीचे पत्र देण्यात आलेला असून त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसून त्यावर दामाजी नगर ग्रामपंचायत व चोखामेळा नगर ग्रामपंचायत यांनी सुद्धा तात्काळ लक्ष देऊन आपण ज्या कोणाच्या दुकानावरील इंग्रजी पाट्या असतील त्यांना नोटीस  बजावून त्यांना मराठी अनिवार्य आहे असं समजवण्यात याव नाहीतर ग्रामपंचायत कार्यालयाला सुद्धा मनसेकडून व ग्रामपंचायत कार्यालयाला शासनाचा जीआर पद्धतीने काम न केल्याचा ठपका ग्रामपंचायतीवर पडू शकतो त्यामुळे दामाजी नगर ग्रामपंचायत व चोखामेळा नगर ग्रामपंचायत यांनी तातडीने नोटीस बजावून तिथे कारवाई करावी अन्यथा मनसे आपलं काम करेल अशी माहिती शहराध्यक्ष राजवीर हजारे यांनी दिली.


test banner