मंगळवेढा येथील वैभवलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा काल दि.९/४ रोजी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रथम वर्धापन दिन संपन्न झाला.
या वेळी धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमन शोभा काळुंगे,राजमाता अर्बन बँकेचे चेअरमन डॉ.अशोक सुरवसे, श्री संत दामाजी साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग भाकरे,नेताजी चव्हाण,सिद्धेश्वर नाईकवाडी,भारत लेंडवे,महालक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक हरिश्चंद्र तटाळे,समाधान गायकवाड,लेखापरीक्षक ज्ञानेश्वर भंडगे,राजमाता बँकेचे मॅनेजर नवनाथ दिवसे,सिद्धेश्वर रोकडे, समस्त चेअरमन, व्हॉइस चेअरमन,संचालक,कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
या संस्थेने एका वर्षामध्ये जवळपास साडेसहा कोटी रुपयांचा व्यवसायाचा टप्पा पूर्ण करून दुसऱ्या वर्षात पदार्पण केले आहे. संस्थेचे ग्राहक,ठेवीदार,कर्जदार यांचा विश्वास कायम राहील अशी आशा वैभव लक्ष्मी पतसंस्थेच्या चेअरमन सौ.अश्विनी वैभव लेंडवे यांनी यावेळी व्यक्त केली.