राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगोला मतदार संघाच्या निरीक्षक पदी यांची निवड. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, ३ मार्च, २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगोला मतदार संघाच्या निरीक्षक पदी यांची निवड.


प्रतिनिधी:-

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी,पक्ष बळकटीसाठी व आगामी लोकसभा लक्ष्यात घेता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला विधान सभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निरीक्षक पदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष अजित जगताप यांची निवड करण्यात आली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे यांनी जिल्ह्यामध्ये विधानसभा मतदारसंघ निहाय पक्ष्याचे निरीक्षक नेमले आहेत.


या मतदारसंघा निहाय सांगोला मतदार संघामध्ये अजित पवार यांचे कट्टर समर्थक व विश्वासू मानले जाणारे पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचे अध्यक्ष अजित जगताप यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली.


निवडीनंतर जगताप बोलताना म्हणाले की सांगोला मतदार संघामध्ये जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसेच महायुतीच्या उमेदवारास सांगोला येथून अधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व दिपक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार असल्याचे नूतन निरीक्षक जगताप यांनी सांगितले.


तसेच प्रदेश कार्यालयाकडून येणारे सर्व कार्यक्रम प्रभावीपणे पार पडावेत व पक्ष मजबुती साठी पक्ष्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


तसेच निरीक्षक यांनी केलेल्या कार्याचा अहवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर येथील कार्यालय येथे तातडीने देण्यात यावा असे देखील सांगण्यात आले आहे.


test banner