मतदार जनजागृती अभियानातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल श्री संत दामाजी महाविद्यालयालयास विशेष पुरस्कार. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २ मार्च, २०२४

मतदार जनजागृती अभियानातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल श्री संत दामाजी महाविद्यालयालयास विशेष पुरस्कार.


मंगळवेढा:-

श्री विद्या विकास मंडळ संचलित,श्री संत दामाजी महाविद्यालयाने शासनाच्या मतदार जनजागृती अभियानात उल्लेखनीय कार्य करून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल डॅा.एन.बी.पवार यांना उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार,महाविद्यालयाचे मतदार जनसंपर्क अधिकारी प्रा.डॉ.संजय क्षीरसागर यांना उत्कृष्ट संपर्क अधिकारी पुरस्कार तसेच महाविद्यालयातील बी.ए.भाग एक मधील विद्यार्थी आनंदा वरकुटे यास उत्कृष्ट सदिच्छा दूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


मतदार जनजागृती अभियान 2023 -24 मध्ये नावीन्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल राज्य मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे तसेच सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.


मतदार जनजागृती अभियानातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल श्री संत दामाजी महाविद्यालयालयास विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदरचा नावलौकिक प्राप्त केल्याबद्दल डॉ.एन.बी पवार, डॉ.संजय क्षीरसागर,आनंदा वरकुटे राष्ट्रीय सेवा योजनेचे महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नवनाथ जगताप,प्रा.डॉ.दत्तात्रय गायकवाड, प्रा.डॉ.राजेश गावकरे तसेच प्रा.शैलेश मंगळवेढेकर यांचेही सहकार्य लाभल्याने महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे सचिव किसनराव गवळी यांच्या हस्ते करण्यात आला.


यावेळी डॉ.पवार म्हणाले, आपले महाविद्यालय सातत्याने शासनाचे आणि विद्यापीठाचे विविध उपक्रम हिरीरीने राबवत असते.आपण नेहमीच समाजामध्ये मिसळून  काम करतो आहे.


मतदार जागृतीच्या निमित्ताने आपण आपल्या महाविद्यालयातील प्रत्येक वर्गामध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्यामध्ये जनजागृती व नाव नोंदणी केली होती,मंगळवेढा शहरांमध्येही रॅली काढून जनजागृती केली होती.त्याचबरोबर खेड्यापाड्यांमध्येही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण कार्यक्रम घेऊन जनजागृती केली या सर्व कामाची नोंद घेऊन हे तिन्ही पातळीवरील मिळालेले पुरस्कार आपल्या सर्वांच्या कामाची पोचपावती आहे.


याप्रसंगी प्रा.डॉ.नवनाथ जगताप,प्रा.डॉ.संजय क्षीरसागर,नॅक समन्वयक प्रा.डॉ.परमेश्वर होनराव तसेच महाविद्यालयाचा विद्यार्थी आनंदा वरकुटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


या कार्यक्रमासाठी वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ.राजकुमार पवार यांनी केले तर,आभार प्रा.डॉ.संजय शिवशरण यांनी मानले.


test banner