काँग्रेस कमिटी कडून या मेळाव्याचे आयोजन,हे मान्यवर राहणार उपस्थित. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, १९ मार्च, २०२४

काँग्रेस कमिटी कडून या मेळाव्याचे आयोजन,हे मान्यवर राहणार उपस्थित.


मंगळवेढा:-

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय घडामोडींना वेग आला आहे.उमेदवारांचे गावभेट दौरे,सभा,भेटीगाठी देखील सुरुवात झाली आहे.


सोलापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडी कडून मा.केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आ.प्रणिती शिंदे यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून त्यांनी गावभेट दौरे,भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.


या आधी त्यांनी मतदार संघातील "ताई आपल्या दारी"या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेतील समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्नशिल राहिल्या आहेत.


आज दि.१९ मार्च रोजी सायंकाळी ६.०० वाजता काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्ता संकल्प मेळाव्याचे मारुती पटांगण जुन्या पोलिस स्टेशन समोर आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत साळे यांनी दिली.


या मेळाव्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले,अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य आमदार प्रणिती शिंदे, महाविकास आघाडीचे मंगळवेढा शहर व तालुका पदाधिकारी,कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


या मेळाव्याला मंगळवेढा शहरातील तालुक्यातील महाविकास आघाडी सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत साळे यांच्याकडून करण्यात आले आहे.test banner