सोलापूर लोकसभेच्या भाजपाच्या उमेदवार पदी यांच्या नावाची चर्चा. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १७ मार्च, २०२४

सोलापूर लोकसभेच्या भाजपाच्या उमेदवार पदी यांच्या नावाची चर्चा.


प्रतिनिधी:-

लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली असता राजकीय हालचालींना मोठ्ठ्या प्रमाणात वेग आलेला दिसून येत आहे.


भाजपची उमेदवारांची दोन याद्या जाहीर झाल्या आहेत.या दोन्ही यादीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील भाजपाच्या उमेदवाराचे नाव अद्यापही घोषित करण्यात आलेले नाही.


दरम्यान महाविकास आघाडी (काँग्रेस) कडून प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असून त्यांनी ताई आपल्या दारी या उपक्रमातून गावभेट दौरे सुरू केले आहेत.


आता सोलापूर भाजपचा लोकसभेचा उमेदवार म्हणून भाजपची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे माळशिरस चे आमदार राम सातपुते यांच्या नावाची चर्चा सध्या जोरात सुरू असताना दिसत आहे.


भाजपची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळख असणारे माळशिरसचे आ.राम सातपुते यांनी आपल्या कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.


आ.प्रणिती शिंदे यांच्या समोर तगडे आव्हान उभे करण्या साठी आ.राम सातपुते यांच्या नावाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.test banner