अखेर प्रतीक्षा संपली!लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले,येवढ्या टप्प्यात होणार देश्याचे मतदान तर महाराष्ट्रात होणार एवढा टप्प्यांमध्ये मतदान. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, १६ मार्च, २०२४

अखेर प्रतीक्षा संपली!लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले,येवढ्या टप्प्यात होणार देश्याचे मतदान तर महाराष्ट्रात होणार एवढा टप्प्यांमध्ये मतदान.


प्रतिनिधी:-

आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली.सगळ्यांचं लक्ष लागून असलेली लोकसभा निवडणुक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला.


यामध्ये देशात 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.तर महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.


मागील दोन वर्षापासून राजकारणात मोठ्ठे बदल झालेले दिसून आले.या मध्ये आधी महविकास आघाडी सत्तेत होती.तर त्यांनतर महायुती सत्तेत आली.


चीफ इलेक्शन कमिशनर राजीव कुमार पुढे बोलताना म्हणाले की निवडणूक 16 जूनला लोकसभेचा कार्यकाळ संपणार आहे.मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव.जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचेही त्यांनी आवाहन केले आहे.


महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात मतदान होणार आहे.त्यामध्ये ११ एप्रिल,२६ एप्रिल,७ मे,१३ मे आणि २० मे अश्या पाच टप्यांमध्ये मतदान होईल.


असे असणार महाराष्ट्रातील 5 टप्प्यांमधील मतदान.


19 एप्रिल (पहिला टप्पा):- रामटेक, नागपूर,भंडारा-गोंदिया,गडचिरोली चंद्रपूर (५ मतदार संघ).


26 एप्रिल(दुसरा टप्पा):- बुलढाणा, अमरावती,अकोला,वर्धा,यवतमाळ,वाशिम,हिंगोली,नांदेड,परभणी (८ मतदारसंघ).


7 मे(तिसरा टप्पा):- रायगड,बारामती, धाराशिव,लातूर,सोलापूर,माढा,सांगली,सातारा,रत्नागिरी-सिंधुदुर्ग,कोल्हापूर,हातकणंगले.(११ मतदार संघ).


13 मे(चौथा टप्पा):- जळगाव,रावेर, नांदेड,जालना,छत्रपती संभाजीनगर,पुणे,शिरूर,मावळ,अहमदनगर,शिर्डी,बीड(११ मतदार संघ).


20 मे(पाचवा टप्पा):-नाशिक,धुळे,दिंडोरी, ठाणे व मुंबईतील मतदारसंघ (१३ मतदार संघ).


अश्या प्रकारे महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.


आज दुपारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. तर देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे व महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.


test banner