मंगळवेढा:-
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर व तालुक्यातील पदाधिकारी यांनी थेट रस्त्यावरती उतरून निषेध केला. प्रांत कार्यालय या ठिकाणी सुमारे 2 तास ठिय्या मांडून या चौकशी प्रकरणी सरकार विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या.
त्यानंतर मंगळवेढा पंढरपूर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान सभा कार्याध्यक्ष मुज्यमिल काझी शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मंगळवेढा शहराध्यक्ष जमीर इनामदार व विशाल खटकाळे यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
तर मंगळवेढा येथील प्रांत अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदना द्वारे निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी तालुका उपाध्यक्ष संतोष रंदवे,युवक मंगळवेढा तालुकाध्यक्ष अजिंक्य बेद्रे,शहर उपाध्यक्ष वैभव ठेंगील,अनवर मुल्ला, सचिन वडतीले व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.