पक्ष बळकटी साठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सोलापूर दौरा - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०२४

पक्ष बळकटी साठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सोलापूर दौरा


सोलापूर:-

पक्ष बांधणीसाठी,पक्षाच्या बळकटीसाठी,वाढीसाठी,जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन,मेळावे,स्थानिक नेत्यांच्या भेटी, माजी नगरसेवक व स्थानिक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश अश्या कार्यक्रमासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोलापूर दौरा पार पडणार आहे.


याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे तीन वेळा सोलापूरात येऊन गेले आता आज शनिवारी अजित पवार दिवसभराच्या भेटी साठी सोलापूर मध्ये येत आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेस फुटी नंतर अजित पवार गट पक्ष वाढीसाठी पहिल्यांदाच सोलापूर मध्ये सक्रिय झालेले दिसून येत आहेत.पक्ष्याचा शहर व जिल्हा कार्यकारणी घोषित झाल्यानंतर स्वतंत्र कार्यालय ही थाटण्यात आली आहेत.


सोलापूर येथे जुन्या एम्प्लॉयमेंट चौकाजवळ पंखा विहीर परिसरात जिल्हा कार्यालय तर शहर कार्यालय गिरणी आवारा जवळील चौकात सुरू करण्यात आले आहे. या दोन्ही कार्यालयाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


साधारणतः १० वाजता लातूर येथून सोलापूर मध्ये आगमन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री  अजित पवार हे प्रथम ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत.


त्यांनतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय विकासकामांचा आढावा घेऊन नियोजन असलेल्या पक्षीय कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.


 मा.नगरसेवक किसन जाधव यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराच्या शुभारंभ करून अन्य विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यांनतर पक्षाच्या आयोजित जिल्हा मेळाव्यामध्ये त्यांचे मार्गदर्शन होणार असून त्याच्या आधी शहर कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित मेळाव्यामध्ये शरद पवार गटाचे मा.नगरसेवक सुभाष डांगे,बिज्जू प्रधाने, मंदाकिनी तोडकरी,किशोर पाटील आदींसह अन्य नेते व कार्यकर्ते अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.


तर सायंकाळी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाने आयोजित केलेल्या ट्रस्टी संवाद कार्यक्रमातही अजित पवार सहभागी होणार आहेत.त्यांनतर रात्री दिलीप माने यांची ते भेट घेणार आहेत.


test banner