मंगळवेढा:-
माझ्या जीवनात माझे डोळे गेले आहेत पण दृष्टी नाही असे मत अनघा प्रदिप मोडक यांनी व्यक्त केले त्या मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांच्या वतीने ४८ व्या वर्षी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातील व्याख्यानात जगण्याचे गाणे होताना या विषयावर बोलत होत्या.
सुरवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पूजन करून व्याख्यानाचे उदघाटन माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्षस्थानी डॉ सुभाष कदम उपस्थित होते.
यावेळी अनघा मोडक म्हणाल्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲाक्सिजन आहे एरवी पैशाचे सुख शोधणारा माणूस मात्र कोरोनाच्या काळात मात्र ॲाक्सिजन शोधायला लागला.कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी कठोर परीश्रमच करावे लागतात.जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने टिपता आला पाहिजे नकारात्मक विचारांची फोडणी घालून आयुष्याची चव चाखता आली पाहिजे.
आपल्या आजुबाजुची व्याकुळता आपले गोकुळ झाले पाहिजे असलेल्या गोष्टी साठवणे ही श्रीमंती नाही तर असलेल्या गोष्टी वाटणे यात खरी श्रीमंती आहे.असे मत व्यक्त करून आयुष्याचे गाणे गात रहा,अपयशाने खचून न जाता प्रयत्नवादी रहा असा संदेशही त्यांनी दिला.
यावेळी अनघा मोडक यांच्या आई पल्लवी मोडक,काकू दिपा बोंगले,रामचंद्र वाकडे,भिमराव मोरे,मारूती वाकडे,ॲड बी बी जाधव,ज्ञानेश्वर भगरे,अरूण किल्लेदार,ॲड रमेश जोशी,सोमनाथ माळी,विष्णूपंत जगताप,अजित खंडू दत्तू,सोमनाथ बुरजे,भारत ढोणे यांचेसह सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष गणेश सावंजी,शिवभक्त उपस्थित होते पाहुण्यांचा परिचय प्रा विनायक कलुबर्मे यांनी करून दिला सूत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी करून आभार मानले.