राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी यांची निवड. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, ४ फेब्रुवारी, २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी यांची निवड.


मंगळवेढा:- 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजित पवार) गटाच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी गावचे मा.सरपंच रामेश्वर मासाळ यांची निवड करण्यात आली आहे. 


यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते मासाळ यांना निवडीचे पत्र देण्यात आले.


रामेश्वर मासाळ यांनी या आधी राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा अध्यक्ष या पदावरती आपली छाप पाडली आहे. तसेच ते अजित पवार यांचे समर्थक देखील मानले जातात.


त्यांच्या या निवडीवेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे,सोलापूर जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे पाटील,प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील,सरचिटणीस लतिफ तांबोळी,तालुकाध्यक्ष भारत बेद्रे,मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा अध्यक्ष अजीत जगताप, मंगळवेढा शहराध्यक्ष प्रवीण खवतोडे आदी मान्यवर उपस्थित होते.


test banner