प्रतिनिधी :-
गेल्या अनेक दिवसा पासून शिक्षक भरती कधी होणार याची वाट पाहत बसणाऱ्या अभियोग्यता धारक विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली.
5फेब्रुवारी पासून पसंती क्रम निवडण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली होती. शिक्षक भरती साठी पवित्र पोर्टल वर पसंती क्रम निवडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आजपर्यंत १,४१,४४७ पसंतीक्रम जनरेट झाले आहेत, व १,३५,८५५ उमेदवारांनी पसंतीक्रम लॉक देखील केले आहेत.पसंतीक्रम लॉक सुविधा आज रात्री 12 पर्यंत चालू असेल . या मध्ये बिगर मुलाखत आणि मुलाखत अशा दोन पद्धतीने पसंती क्रम निवडण्यात आले आहेत पहिल्या टप्या मध्ये 22 हजार जागे वरती भरती होणार असून पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात न्यायालयात एक याचिका दाखल आहे त्यामुळे शिक्षक भरतीला अडथळा येण्याची शक्यता 13 फेब्रुवारी 2024 औरंगाबाद खंडपीठात शिक्षक भरती संदर्भात याचिका दाखल आहे त्याची सुनावणी आहे त्या सुनावणीवर शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया अवलंबून असेल.