मंगळवेढा:-
गावात पत,घरात एकमत आणि शेतात शेणखत असणे आज काळाची गरज निर्माण झाली आहे.असे विचार डॉ रामपाल महाराज धारकर तुरखेड जि अमरावती यांनी व्यक्त केले ते मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांच्या वतीने ४८ व्या वर्षी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात खंजीरी वादनातून प्रबोधन करत होते.
यावेळी रामपाल की रहस्यवाणीतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार सप्तखंजीरी वादनातून व्यक्त केले. सुरवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पूजन अभिजीत पाटील यांच्या हस्ते व सचिन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
यावेळी डॉ रामपाल महाराज म्हणाले खरा देव माणसात आहे अंगात ताप मोजण्यासाठी यंत्र आहे पण माणसाची नियत किती खराब आहे हे मोजण्यासाठी कोणतेही यंत्र नाही तरूणांची दिशा भरकटत चालली आहे.
त्यांना सावरणे आवश्यक आहे यासाठी यासाठी व्यसनापासून दुर रहा नात्यामधला विश्वास कमी होत चालला आहे.मुलांना चांगली शाळा शिकवा खरा धर्म हा माणूसकीचा आहे.रंगाची वाटणी करून जाती जातींमध्ये तेड निर्माण करू नका यावेळी मंडळाचे अध्यक्ष गणेश सावंजी,सोमनाथ आवताडे,प्रतिक किल्लेदार,सचिन नागणे,अमोल केदार,अफरोज शेख,सोमनाथ बुरजे,आदी मान्यवर उपस्थित होते.