माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन,अशी होती त्यांची राजकीय कारकीर्द. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन,अशी होती त्यांची राजकीय कारकीर्द.


प्रतिनिधी:-

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे शुक्रवार दि.२३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ३ वाजता वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.


मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांच्या वरती उपचार सुरू होते.


अलीकडील काळात त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ते राजकारणापासून दूर होते. मनोहर जोशी हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते होते.


मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे महापौर,विधान परिषद सदस्य,आमदार,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,खासदार,केंद्रीय अवजड उद्योगमंत्री,लोकसभा अध्यक्ष,राज्यसभा सदस्य अश्या विविध पदांवर त्यांनी काम पाहिले आहे अशी त्यांची राजकीय कारकीर्द होती.


मनोहर जोशी हे मूळचे बीडचे.२ डिसेंबर १९३७ मध्ये रायगड जिल्हा येथील नांदवी या गावी एका मध्यम वर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला.शिक्षणाच्या निमित्ताने मनोहर जोशी हे मुंबई येथे आले.


त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिका येथे त्यांना अधिकाऱ्याची नोकरी मिळाली,त्यानंतर ते मुंबई येथे स्थायिक झाले.


त्यानंतर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी शिवसेनेत काम सुरू केले.१९९५ साली राज्यात युतीची सत्ता आली असता मनोहर जोशी हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनले.


त्यांनतर गेल्या काही काळात ते राजकारणामध्ये सक्रिय नव्हते.


test banner