श्री संत दामाजी महाविद्यालयात १२ वी बोर्ड परीक्षार्थींचे स्वागत. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, २१ फेब्रुवारी, २०२४

श्री संत दामाजी महाविद्यालयात १२ वी बोर्ड परीक्षार्थींचे स्वागत.


मंगळवेढा:-

श्री विद्या विकास मंडळ संचालित,श्री संत दामाजी महाविद्यालयात प्राचार्य डॅा.एन.बी.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने बुधवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू झालेल्या बारावी बोर्डाच्या इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी आलेल्या सर्व परीक्षार्थींचे व पालकांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले.


यावेळी उपप्राचार्य प्रा.सदाशिव कोकरे,केंद्रसंचालक प्रा. राजेंद्र गायकवाड,उपकेंद्र संचालक प्रा.विलास गुरव,सिद्धेश्वर विद्यामंदिर माचणूर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक जयंत पवार यांचेसह अनेक पालक,शिक्षकांनी विद्यार्थांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करून शुभेच्छा दिल्या श्री संत दामाजी महाविद्यालय या परीक्षा केंद्रावरती ४३१ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.


यावेळी परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था,स्वच्छता,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,बंदोबस्त अशी चोख व्यवस्था महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आली होती. सर्व परीक्षार्थींनी मनोबल वाढवून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे असे आवाहनही महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले.



test banner