मंगळवेढा:-
आज आपल्या देहातील कामक्रोधाचा बकरा मारणे गरजेचे झाले आहे असे मत हभप कृष्णा महाराज जोगदंड यांनी व्यक्त केले ते सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांच्या वतीने आयोजित केलेल्या सोंगी भारूडातून प्रबोधन करत होते सुरवातीस पुलवामा हल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष सिध्देश्वर आवताडे यांच्या हस्ते शिवमुर्तीचे पूजन करण्यात आले.यावेळी जोगदंड महाराज म्हणाले की प्रत्येक माणसामध्ये रज,तमो व सत्व हे तीन गुण असतात त्यातील तामसी गुणांचे विसर्जन केले पाहिजे मनुष्यरूपी देह हे एक गाव आहे त्या गावाचे रक्षण करणे प्रत्येकाचे आहे व्यसनाचे वेड लागण्यापेक्षा देवाचे वेड लागले पाहिजे यावेळी गण,गवळण,जोगवा,बुरगूंडा,लग्न सोहळा,अशी सोंगे घेऊन उपस्थितांची मने जिंकली भारूड हे मनोरंजनासाठी नसून संत एकनाथ महाराजांनी भारूड लोक शिक्षणासाठी लिहिले आहे.
यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष गणेश सावंजी,मुरलीधर घुले,ॲड दत्तात्रय तोडकरी,रामचंद्र कोंडूभैरी,दिगंबर भगरे,सचिन नागणे,दत्तात्रय भोसले,जमीर सुतार,राहुल वाकडे,प्रशांत गायकवाड,मेजर मल्लया स्वामी यांचेसह तालुक्यातील सर्व माजी सैनिक महिला,माजी अध्यक्ष, महिला भगिनी रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचलान प्रा विनायक कलुबर्मे यांनी करून आभार मानले.