जय जवान महिला मंडळाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, १२ जानेवारी, २०२४

जय जवान महिला मंडळाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी.

         


              मंगळवेढा:-जवान महिला मंडळ व ॲग्रीक्रॉस एक्सपोर्टस प्रा.लि.पुणे यांच्यावतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती  साजरी करण्यात आली सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊच्या प्रतिमेचे पूजन करून जिजाऊ वंदना घेण्यात आली‌.

             यावेळी अनेक महिलांनी जिजाऊंची वेशभूषा व लहान मुलांनी छत्रपती शिवराय व मावळ्यांची वेशभूषा केली होती तसेच वक्तृत्व स्पर्धेत अनेक महिलांनी राष्ट्रमाता जिजाऊ बद्दल आपले मनोगत व्यक्त केले.

           कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या सर्व महिलांना ॲग्रीक्रॉस एक्सपोर्टस प्रा.लि.पुणे यांच्यावतीने स्वराज्यमाता जिजाऊ हे पुस्तक भेट देण्यात आले.

          सदर कार्यक्रमात प्रसंगी पद्मिनी गुंगे,अरुणा दत्तू,विद्या गुंगे,वैष्णवी उन्हाळे,शकुंतला गुंगे,रुकसाना मुजावर,सुजाता कसगावडे,सुंदर कसगावडे,लक्ष्मी कसगावडे,कोमल गायकवाड,अश्विनी कसगावडे,पूजा जठार,रूपाली दत्तू,राज्यश्री मुळे,जयश्री दत्तू,सारिका दत्तू,शोभा दत्तू,अनिता मोरे,अश्विनी कदम,फुलाबाई कसगावडे,सुप्रिया दत्तू,रूपाली कसगावडे,अर्चना उन्हाळे,सोनाली दत्तू,प्रतीक्षा दत्तू,अश्विनी दत्तू,उज्वला दत्तू उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अजय अदाटे यांनी मानले.



test banner