कोण होते स्वामी विवेकानंद ?
विवेकवादी, विज्ञानवादी, समाजवादी विवेकानंद
▪️▪️▪️लोकायत, जनता साप्ताहिक
विवेकानंद म्हणतात...
(१)
• भाग्य नावाची अशी कोणतीही गोष्ट नाही.
(२)
• धूर्त पुरोहित वेद-पुराणे आणि हिंदू धर्माच्या नावावर हास्यास्पद आणि वेडसर गोष्टी शिकवत आहेत. कलियुगातल्या ह्या ... रूपी राक्षसांपासून ईश्वर लोकांचे रक्षण करो.
(३)
•धार्मिक पुस्तकांवर डोळे मिटून विश्वास ठेवू नका, सत्याचा शोध तर्काच्या आधारावर स्वतः करा.
(४)
• जातीव्यवस्था भारताच्या पर्यावरणामध्ये आपली दुर्गंधी पसरवत आहे... आम्ही खालच्या जातीच्या लोकांना शिवत नाही, त्यांच्यापासून पळ काढतो. आम्ही माणसे आहोत का?
(५)
• भारताचा अभ्युदय करायचा असेल, तर हिंदू धर्म व इस्लाम ह्यांच्यात केवळ सहकार्यच नव्हे तर संगम हवा.
(६)
•सर्व धर्माचा एकच आदर्श आहे- स्वातंत्र्य प्राप्ती आणि दुःखापासून मुक्ती !
(७)
• ह्या देशातील ख्रिश्चन आणि मुसलमान धर्मांतरे दबावामुळे नव्हे तर उच्चवर्णीयांनी
केलेल्या अत्याचारांमुळे झाली आहेत.
(८)
• धर्माने सामाजिक बाबींमध्ये लुडबुड करता कामा नये. प्रत्येकाला त्याच्या इच्छेनुसार माहिती घेण्याचे, निवडीचे आणि अनुसरण करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे. कुणाला मांसाहार ठीक वाटत असेल तर दुसऱ्या कुणाला फलाहार. दुसऱ्यांनी आपलेच अनुसरण करावे ह्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा कोणालाही अधिकार नाही.
(९)
• स्त्रिया मुक्त झाल्याशिवाय देशाची प्रगती शक्य नाही.
(१०)
• समाजवाद ही परिपूर्ण रचना आहे म्हणून मी समाजवादी आहे असे नाही... आजवर इतर सर्व व्यवस्था अनुभवून झाल्या असून त्यामध्येही कमतरता होत्या. आता हा प्रयोग होऊ द्या.
(११)
• जोपर्यंत कोट्यवधी लोक भुकेलेले आणि अज्ञानी राहतील, तोपर्यंत मी प्रत्येकाला विश्वासघातकी समजेन, जो त्यांच्या पैशावर शिक्षित तर झाला पण त्यांच्याकडे जराही लक्ष देत नाही.
♦️▪️स्वामी विवेकानंदांचे तरुणांना आवाहन :
युवकांनी थोडा स्वार्थत्याग करून गरिबांच्या उन्नतीसाठी काम करावे, कारण ते त्यांचे समाजाप्रती असलेले कर्तव्य आहे, हे युवकांपर्यंत सांगण्यासाठी विवेकानंदांनी भारतभर भ्रमण केले. ते म्हणाले:
स्वर्ग असो वा नसो, आत्मा असो वा नसो, कुठली अनश्वर शक्ती असो वा नसो, त्याची काळजी कोण करतो? आपल्यासमोर हे जग आहे आणि ते दुःखाने भरलेले आहे. बुद्धाप्रमाणे बाहेर पडून ह्या संसार-सागरात झोकून द्या, दुःख कमी करण्यासाठी संघर्ष करा, किंवा ह्या प्रयत्नात आपल्या जीवनाचा त्याग करा. स्वतःला विसरून जा. आस्तिक असा वा नास्तिक, अज्ञेयवादी असा वा वेदांतवादी, ख्रिश्चन असा वा मुसलमान- प्रत्येकासाठी हा पहिला धडा आहे.
आपल्या इच्छा-आकांक्षांचा त्याग करून गरिबांची सेवा करण्यासाठी बाहेर पडणे हे वाटते तितके सोपे नाही. अनेक जण ह्याचा विरोध करतील आणि अनेक जण ह्याची चेष्टाही करतील. आपल्या एका शिष्याला लिहिलेल्या पत्रात विवेकानंद म्हणतात की ही परीक्षा पार करणे गरजेचे आहे. ही तीच शाळा आहे, जी आपल्याला पोलादाप्रमाणे मजबूत बनवते.
लोकांनी माझी चेष्टा केली, माझ्यावर अविश्वास दाखवला आणि त्याच लोकांनी माझा उपहास आणि तिरस्कार केला ज्यांना सहानुभूति दाखवल्यामुळे मला संकटांना तोंड द्यायला लागले आहे. हे वत्सा, हीच तर खरी दुःखाची शाळा आहे, महान आत्मा आणि पैगंबरांचीही शाळा आहे, जिथे सहानुभूति, धैर्य आणि अदम्य इच्छा-शक्ती विकसित होते जी जगाचा विनाश झाला तरी थरथरणार नाही. पण विरोधाला न जुमानता आपण दृढपणे चालतच राहिलो, तर एक ना एक दिवस लोक आपल्या ध्येयाचा सच्चेपणा मानतील आणि त्याचा स्वीकारही करतील.
प्रत्येक कामाला तीन अवस्थांमधून जावे लागते-उपहास, विरोध आणि मग स्वीकृती. प्रत्येक व्यक्ती जो आपल्या काळाच्या पुढे विचार करतो, त्याला निश्चितच चुकीचे समजले जाते. पण विवेकानंदांना आत्मविश्वास होता की, भारतातील युवक पुढे येतील आणि हे आव्हान स्वीकारतील आणि हजारोंच्या संख्येने मानव जातीच्या सेवेसाठी पुढे येतील. मला निश्चित ठाऊक आहे की, भारतमातेला तिच्या सर्वोत्कृष्ट व सर्वश्रेष्ठ संतानांच्या बलिदानाची आवश्यकता आहे
काही युवकांनी ह्यात स्वतःला झोकून दिले आहे, आपल्या प्राणांचे बलिदान केले आहे. पण त्यांची संख्या थोडी आहे, आम्हाला त्यांच्यासारखे हजारो जण पाहिजेत आणि ते येतील.
♦️आपण मरणार, हे तर निश्चित आहे. मग सत्कार्य करता करता मरूया... संपूर्ण जग एक आहे; तुम्ही त्याचा एक अतिशय क्षुल्लक अंश आहात, आणि म्हणूनच ह्या तुच्छ 'अहं'च्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्याऐवजी तुमच्या कोट्यवधी बांधवांची सेवा करणे हेच तुमच्यासाठी योग्य ठरेल.
विवेकानंदांचे पूर्ण आयुष्य म्हणजे भारतातील तरुण-तरुणींना देशासाठी बलिदान करण्यासाठी प्रेरित करण्याच्या अथक प्रवासाची एक महान गाथा आहे- त्यामुळे ते सामान्य जनतेबरोबर जातील, त्यांना उन्नत करतील, त्यांना संघटित करतील आणि सर्व प्रकारच्या शोषणातून मुक्त अशा नवसमाजाची निर्मिती करतील. ह्यात ते यशस्वी होतील ह्यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता.
🍃माझ्यावर विश्वास ठेवा, आपल्या बलिदानामुळे, विशाल आणि अप्रतिम कार्यकर्ते तयार होतील जे जगभरामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणतील."
- स्वामी विवेकानंद
संकलन :
अजय आदाटे (मंगळवेढा).