श्री संत दामाजी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, १२ जानेवारी, २०२४

श्री संत दामाजी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी.




                  मंगळवेढा:श्री विद्या विकास मंडळ संचलित,श्री संत दामाजी महाविद्यालयात १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य प्रोफेसर डॉ एन बी पवार,उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे, पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

                 याप्रसंगी डॉ पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तिमत्त्वांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी व आपल्या जीवनाची वाटचाल करावी या हेतूनेच महान व्यक्तींच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात राजमाता जिजाऊंचे जीवन चरित्र प्रेरणादायी असे आहे.

                 जिजाऊंच्या काळातील परिस्थिती खूप अवघड होती अन्याय, अत्याचारात जनता भरडली गेली होती अनेकजन घरदारे सोडून निघून गेले होते अशा काळात जिजाऊंनी सर्वसामान्य लोकांच्या मनात विश्वास निर्माण करून आधार दिला स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवरायांना प्रेरणा दिली चांगले संस्कार आणि शिकवण देऊन दोन छत्रपतींना त्यांनी घडविले अन्याय करणाऱ्या व अत्याचारी प्रवृत्तीचा शेवट केला अन्याय करायचाही नाही आणि अन्याय सहनही करायचा नाही हा विचार त्यांनी दिला स्वामी विवेकानंदांचेही जीवन सर्वांसाठी आदर्शवत असेच आहे.

                त्यांनी मानवता धर्म शिकविला,भारतीय संस्कृतीचे महत्त्व जगाला पटवून दिले सर्व धर्माचे सार मानवता आणि मानवी कल्याण हेच आहे हे त्यांनी सांगितले, युवकांमध्ये प्रेरणा निर्माण केली भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आता झाला असून आपण शतकोमहोत्सवाकडे वाटचाल करत आहोत त्यावेळी भारत हे एक विकसित राष्ट्र म्हणून जगाला दाखवायचे आहे.

               त्या दृष्टीने देश वाटचालही करत आहे देशाची प्रगती करायची असेल तर तरुणांनी ह्या आदर्शांचा विचार समोर ठेवून कार्य केले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी याप्रसंगी  व्यक्त केली.

               सदर कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील आनंदा वरकुटे, कोमल देवकते,निकिता आवताडे,कोमल बनसोडे,गायत्री खांडेकर,गायत्री जाधव या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.

 यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते .

               कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ राजकुमार पवार यांनी केले तर आभार प्रा विनायक कलुबर्मे  यांनी मानले.




test banner