सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी गणेश सावंजी यांची निवड. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, १५ जानेवारी, २०२४

सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी गणेश सावंजी यांची निवड.

                 


                         मंगळवेढा:सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक दि.१४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता लक्ष्मी नारायण मंगल कर्यालय येथे आयोजित करण्यात आली.

                       सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पूजन करण्यात आले. मंडळाच्या दोन्ही अध्यक्षांनी आपली जबाबदारी योग्य रित्या पार पाडल्याबद्दल माजी अध्यक्ष चंद्रकांत काकडे यांचा सत्कार माजी अध्यक्ष रामचंद्र वाकडे यांच्या हस्ते तर अनिल मुदगुल यांचा सत्कार माजी अध्यक्ष भीमराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.


                       यावेळी माजी अध्यक्ष चंद्रकांत काकडे यांनी मागील वर्षीचा जमाखर्चाचा हिशोब सादर केला.

                       महेश हजारे यांची गैबीपिर उरूस कमिटीच्या सरपंच पदी निवड झाल्याबद्दल रामचंद्र वाकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

                        त्यांनतर सकल मराठा समाजाच्या वतीने प्रकाश मुळीक यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंतरवाली सराटी ते मुंबई येथे निघणाऱ्य दिंडीबाबत माहिती दिली व सर्वांनी या दिंडी मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

                      ४८ व्या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी सर्वांनुमते गणेश सावंजी यांची सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

                    त्यांनतर अजित जगताप यांनी स्मारकाबाबत माहिती दिली व मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच हे काम मार्गी लागणार असल्याचे सांगितले.

                     यावेळी मंडळाचे सर्व माजी अध्यक्ष,ज्येष्ठ मंडळी व शिवभक्त मोठ्ठ्या संख्येने उपस्थित होते.



test banner