मंगळवेढा:सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने दिनांक ११ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत ४८ वा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी उद्या मंगळवार दि १६ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता शिवालय येथे कार्यकारणी निवडीची संदर्भात बैठक आयोजित केली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष गणेश सावंजी यांनी केले आहे.
सदर बैठकीत उपाध्यक्ष,सचिव, खजिनदार,सहखजिनदार, वर्गणी प्रमुख, मिरवणूक प्रमुख,सांस्कृतिक, स्टेज,प्रसिद्धी अशा समित्या करून पदाधिकारी निवडण्यात येणार आहेत तरी सर्व शिवभक्तांनी शिवालयात उपस्थित रहावे असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष गणेश सावंजी यांनी केले आहे.