मंगळवेढा तालुक्यातून 25 हजार मराठा बांधव मुंबईच्या मोर्चात सहभागी होणार. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १४ जानेवारी, २०२४

मंगळवेढा तालुक्यातून 25 हजार मराठा बांधव मुंबईच्या मोर्चात सहभागी होणार.



                      मंगळवेढा:मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून पायी पदयात्रा मुंबईकडे निघणार आहे.

                   त्यामध्ये मंगळवेढा तालुक्यातून 25 हजार मराठा बांधव या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत.त्यासंदर्भातली मीटिंग मंगळवेढा मध्ये पार पडली यावेळी माऊली पवार म्हणाले तिकडे मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत म्हणून आपण शांत बसणे योग्य नाही.

                  जास्तीत जास्त संख्येने मराठा बांधवांनी यामध्ये सहभाग नोंदवावा त्याचबरोबर आपल्या कुणबी नोंदी आहेत काय याची शहानिशा प्रत्येक मराठा बांधवांनी करावी या आंदोलनादरम्यान जर मराठा समाज बांधवांना अटक झाली किंवा आडवण्यात आले तर महिलांनी त्या मतदारसंघातील आमदार व खासदाराच्या घरी ठिया आंदोलन करून त्याचा निषेध नोंदवावा असे मत व्यक्त केले.

               


                   यावेळी राजन जाधव,गणेश देशमुख,श्रीरंग लाळे, महेश पवार आदींनी मार्गदर्शन केले सदर मोर्चेच्या नियोजनासाठी मंगळवेढा तालुक्यामधील प्रत्येक गावामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने बैठकांचे आयोजन केलेले आहे. सदर मोहीम भरपूर दिवस चालणार असल्यामुळे जे सहभागी होणार आहेत त्यांनी आपली स्वतःची खाण्याची राहण्याची सर्व साहित्य सोबत घ्यावयाचे आहे या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.


test banner