३१ डिसेंबर निमित्त मंगळवेढे येथे द - दुधाचा, नको दारुचा उपक्रम* वारी परिवार आणि ॲग्रीकॉस एक्सपोर्ट, मंगळवेढा पोलीस स्टेशन यांचा पुढाकार. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, ३१ डिसेंबर, २०२३

३१ डिसेंबर निमित्त मंगळवेढे येथे द - दुधाचा, नको दारुचा उपक्रम* वारी परिवार आणि ॲग्रीकॉस एक्सपोर्ट, मंगळवेढा पोलीस स्टेशन यांचा पुढाकार.


दरवर्षी 31 डिसेंबरला ठिकठिकाणी दारु पार्टीचे आयोजन करण्यात येते. मग ते पब असो, बार असो, रेस्टॉरंट असो किंवा मित्रांच्या पार्ट्या असो, 31 डिसेंबरला जणू दारुचे पाट वाहतात, मंगळवेढेकर मात्र नेहमीच कायतरी हटके करत असतात, यंदाही 31 डिसेंबरला म्हणजे आज मंगळवेद्यात अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे लोकांना दारू न पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 31 डिसेंबरनिमित्त दारू नको दूध प्या अशी हाक देण्यात आली आहे. दामाजी चौक परिसरात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ॲग्री कोर्स एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड पुणे आणि वारी परिवार संस्थेकडून लोकांना या अनोख्या सेलिब्रेशनची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, मंगळवेढा पोलीस आणि सहकारी दूध संस्था, मंगळवेढा यांचे मोलाचे सहकार्य आहे, 


दारु पिणं ही चांगली गोष्ट नाही, हीच बाब ध्यानात घेऊन मंगळवेढा पोलीस स्टेशन व वारी परिवाराने दारु पिऊन नव्हे, तर दूध पिऊन नव्या वर्षाच स्वागत करण्याच आवाहन केलय.

देशाची भावी तरूण पिढी व्यसनमुक्त व सजग बनावी या उदात्त हेतूने मंगळवेढा पोलीस स्टेशन व वारी परिवार मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार दि ३१ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत दामाजी चौकामध्ये दारू नको दूध पिऊया या व्यसनमुक्तपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सध्या तरूणाई व्यसनाकडे मोठ्या प्रमाणात वळत आहे, त्यामुळे त्यांना व्यसनाकडून सदृढतेकडे नेण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला नाही, फक्त तरुणाईच नाही तर सर्वच वयोगटातील लोकांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

सदरच्या उपक्रमाचे यावर्षीचे हे सहावे वर्ष असून यावेळी २०० लीटर मोफत मसाला दुधाचे वाटप करण्यात येणार आहे एक पाऊल व्यसनमुक्त समाजाचे हे ब्रीद वाक्य घेऊन पुढे निघालेल्या वारी परिवाराने मंगळवेढा तालुक्यात व्यसनाच्या आहारी गेलेल्या अनेक तरूणांच्या व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न केलेले आहेत देशाची युवा पिढी जेवढी निरोगी व सशक्त आहे.

यावेळी दारू पिण्याचे तोटे व दुध पिण्याचे फायदे सांगन्यात येणार आहेत तरी जास्तीत जास्त नागरिकांनी दामाजी चौकात मसाला दुध पिण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन ॲग्रीकॉस व वारी परिवाराच्या वतीने करण्यात आलेले आहे.


test banner