दारू नको दुध प्या या उपक्रमातून दिला व्यसनमुक्तीचा नारा वारी परिवार व पोलीस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, १ जानेवारी, २०२४

दारू नको दुध प्या या उपक्रमातून दिला व्यसनमुक्तीचा नारा वारी परिवार व पोलीस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम.

       


                       मंगळवेढा:दारू नको दुध प्या या उपक्रमातून 31 डिसेंबरच्या रात्री मंगळवेढा पोलीस स्टेशन व वारी परिवाराच्या वतीने व्यसनमुक्तीचा नारा देण्यात आला यावेळी प्रथम विठ्ठल मूर्तीचे पूजन  पोलीस निरीक्षक रणजीत माने,रामचंद्र वाकडे,शिवाजीराव काळुंगे,औदुंबर वाडदेकर,अजित जगताप,सोमनाथ आवताडे,मुरलीधर दत्तू,शशिकांत चव्हाण,राजेंद्र सुरवसे,स्वामी मेजर,राजेंद्र चेळेकर,संजय कट्टे,भारत पवार,अजित शिंदे,शहाजी घाडगे, रमेश जोशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले करण्यात आले.

                        यावेळी रणजीत माने म्हणाले दारू पिणे मानवी आरोग्यास खूपच धोकादायक आहे आज पोलीस स्टेशनमध्ये दहा गुन्हयापैकी आठ गुन्हे हे दारूमुळे घडत आहेत ही फारच विचार करण्याची गोष्ट आहे आज घरामधील एक कर्ता पुरूष दारूमुळे मरण पावला तर ते कुंटूब रस्त्यावर येते मग त्या स्त्रीने करायचे काय यासाठी दारूमुक्तीसाठी सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे.

                          वारी परिवाराने व्यसनमुक्त मंगळवेढा हा जो संकल्प केलेला आहे त्यासाठी वारी परिवाराच्या पाठीशी सदैव पोलीस उभे राहतील असेही ते म्हणाले व्यसनमुक्त तरूणच खरी देशाची संपत्ती आहे हे ओळखूनच वारी परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने व पोलीस स्टेशनच्या वतीने 31 डिसेंबरच्या रात्री दामाजी चौकामध्ये दारू नको दूध प्या या उपक्रमातून 2500 लोकांना मोफत मसाला दुधाचे वाटप करून व्यसनमुक्तीचाच नारा दिला आहे 31 डिसेंबर म्हटले की,तरुण युवा वर्ग दारू पिऊन जुन्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असतात. त्या अनुशंगाने मोठया प्रमाणावर हुल्लडबाजी,दारू पिऊन वाहन चालविणे,सांयलेन्सरच्या पुंगळ्या काढून मोठा आवाज करणे त्यामुळे शांतता व सुव्यवस्था भंग पावते तसेच दारूमुळे अपघात होतात,काही लोक मृत्युमूखी पडतात तर काहीजण जखमी होतात परिणामी त्यांच्या कुंटुबाचा आधार गेल्याने संपूर्ण कुंटुब रस्त्यावर येते अशा घटना घडू नयेत यासाठी वारी परिवाराने दारूमुक्तीसाठी उचललेले पाऊल खूप महत्वाचे आहे.

                           या उपक्रमास ॲग्रीक्रॉस एक्सपोर्टस प्रा.लि.पुणे. सोलापुर जिल्हा दुध संघ शाखा मंगळवेढा,श्रीशैल्य राजमाने,संतोष कोंडूभैरी,गणेश पवार दामाजी मंदीर ट्रस्ट यांचे विशेष सहकार्य लाभले पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी,वारी परिवाराचे सर्व सदस्य व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भारत मूढ़े यांनी केले तर आभार अजय अदाटे यांनी मानले.


test banner