धनश्री पतसंस्थेच्या चेअरमन पदी शोभाताई काळुंगे तर व्हा.चेअरमन पदी यांची बिनविरोध निवड. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ८ नोव्हेंबर, २०२३

धनश्री पतसंस्थेच्या चेअरमन पदी शोभाताई काळुंगे तर व्हा.चेअरमन पदी यांची बिनविरोध निवड.

   


               

                    मंगळवेढा:मंगळवेढा मध्ये नावाजलेली व अनेकांच्या विश्वासास पात्र ठरलेली धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चेअमनपदी प्रा.शोभाताई काळूंगे तर व्हा.चेअरमनपदी शांताबाई धायगोंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

                  ही निवड सन 2023-24 ते 2028-29 या कालावधीसाठी संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.या बाबतचे पत्र 27 ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या कडून देण्यात आले.

                 त्यानुसार मंगळवार दि.७ नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता संस्थेच्या कार्यालयात सभा घेण्यात आली.सभेचे अध्यक्षस्थान हे निवडणूक निर्णय अधिकारी मंगळवेढा सहाय्यक निबंधक पी. सी.दूरगुडे होते.

                 तर सभेमध्ये संचालक मंडळातून चेअरमन पदासाठी शोभा शिवाजीराव काळुंगे तर व्हा.चेअरमन पदासाठी शांताबाई श्रीशैल्य धायागोंडे यांचा प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाला.

              यावेळी चेअरमन व व्हा.चेअरमन पदासाठी एकच अर्ज प्राप्त झाल्यामुळे शोभा शिवाजीराव काळुंगे यांची चेअरमनपदी व शांताबाई श्रीशैल्य धायगुंडे यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

            त्याप्रसंगी नूतन चेअरमन,व्हा.चेअरमन व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे,राजलक्ष्मी काळुंगे- गायकवाड,किसन सावंजी,शिवाजी पवार,कल्याण रोकडे,ज्ञानदेव जावीर आदी.मान्यवर उपस्थित होते.


test banner