मंगळवेढ्यात मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण स्थगीत. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, ४ नोव्हेंबर, २०२३

मंगळवेढ्यात मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण स्थगीत.

 


              

                 मंगळवेढा:मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी व मराठायुद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मंगळवेढा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने दामाजी चौकातील सुरू असलेले साखळी उपोषण पुढील आदेश येईपर्यंत सर्वानुमते स्थगित करण्यात आले.

                दिनांक २५ ऑक्टोबर पासून मंगळवेढ्यात सकाळी १० ते २ व दुपारी २ ते सायं ६ पर्यंत प्रत्येक गल्लीवाईज उत्तम नियोजन करून साखळी उपोषण करण्यात आले होते.

                सदर बैठकीत अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांना माजी न्यायमूर्ती गायकवाड समितीचे सदस्य व शासनाचे शिष्टमंडळ भेटल्यानंतर पाटील यांनी शासनाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी २४ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देऊन उपोषण स्थगित केलेल्याची घोषणा केली. 

       


              सदर कालावधीत शासनाने सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे तसेच विविध मागण्यांसंदर्भात झालेल्या चर्चेचा आढावा बैठकीत घेण्यात आला शासनाची मुदत संपल्यानंतर पुढील आदेश येईपर्यंत आंदोलन स्थगित केले असले तरी आंदोलन संपले नाही तर मधल्या दिवसांमध्ये मंगळवेढा तालुक्यात कुणबी नोंद असलेले दाखले तहसील कार्यालयातील दप्तरातून शोधले जाणार आहेत.

                तसेच गरज पडल्यास मुंबईच्या आंदोलनाचे नियोजन देखील केले जाणार आहे. यावेळी पाटील यांच्या ९ दिवसाच्या आमरण उपोषणामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यासाठी त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी  समाजाच्या वतीने पांडुरंगाकडे साकडेही घालण्यात आले. 

              यावेळी मंगळवेढा तालुक्यात आमरण उपोषणास बसलेल्या,साखळी उपोषणात सबंध तालुक्यातील सहभागी झालेल्या मराठा बांधवांचे व इतर सर्वच समाजातील बांधवांचे आभार व्यक्त करण्यात आले यावेळी मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


test banner