आवताडे शुगर कडून २५५१ रुपयांचा उसाचा पहिला हप्ता जाहीर. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३

आवताडे शुगर कडून २५५१ रुपयांचा उसाचा पहिला हप्ता जाहीर.

 


                   मंगळवेढा:मंगळवेढा तालुक्यातील नंदुरच्या आवताडे शुगर्स अँड प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याने उसाचा दर जाहीर केला असून  पहिला हप्ता २५५१ रुपये देणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांनी सांगितले.

         


                  आज शुक्रवार दि.3 रोजी कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांच्या उपस्थित व कारखान्याचे टेक्निकल विभगाचे व्यवस्थापक सुहास शिनगारे व त्यांच्या पत्नी गौरी शिनगारे यांच्या हस्ते होमहवन व सत्यनारायण महापूजा करून डिस्टीलरी विभागाचा द्वितीय बॉयलर अग्नी प्रदिपण करण्यात आला.

                    त्यावेळी बोलताना चेअरमन संजय आवताडे म्हणाले की,आमदार समाधान दादा आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली फॅबटेक समूहातून हा कारखाना खरेदी करून अवताडे शुगर मध्ये रूपांतरित केल्यानंतर पहिल्या गळीत हंगामामध्ये २३५० रुपये ऊस दर देत खाजगी कारखानदारी मध्ये सर्वाधिक दर दिला होता.

       


                   आम्ही हा कारखाना केवळ शेतकऱ्यांची हितासाठी घेतला असून या कारखान्यामधून आम्ही कोणताही स्वार्थ ठेवला नाही.गेल्या गळीत हंगामामध्ये कारखान्याचे सर्व कर्मचारी ऊस पुरवठादार ऊस वाहतूकदार ऊसतोड मजूर व कारखाना प्रशासनाने मन लावून व प्रामाणिक काम केल्यामुळे गतवर्षीचा गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पडला असून चालू गळीत हंगाम देखील यशस्वीरित्या पार पाडून शेतकऱ्यांचे समाधान होईल असा जास्तीत जास्त प्रयत्न असणार आहे.

                   तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आमच्या विश्वास ठेवून आपला ऊस आवताडे शुगर्स ला घालून सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन संजय आवताडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

                 यावेळी मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे,मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके,कार्यकारी संचालक मोहन पिसे, डिस्टलरी मॅनेजर संभाजी फाळके,विजय माने,पप्पू काकेकर,शाम पवार,चंदू गोडसे,गोपाळ पवार,श्रीकांत पवार,मोहन पवार,बजरंग जाधव,राहुल नागणे, तोहिद शेख,डॉ जगताप,रमेश टाकणे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


test banner