टीम संवाद न्यूज :
उद्या रविवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मंगळवेढ्यात समृद्धी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ आयोजित केला आहे. कार्यक्रमानिमित्त कोल्हापूरच्या प्रा. डॉ.प्रीती शिंदे यांचे शक्तीचे नावच नारी आहे या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.
सदरचे व्याख्यान सायंकाळी ६.३० वाजता मारुती
पटांगण बाजार चौक मंगळवेढा येथे आयोजित केले आहे.
मंगळवेढा तालुक्यातील नागरिकांना गुंतवणुकीसाठी
आणि कर्ज सहाय्यासाठी चांगल्या संधी घेवून आलेली आहे त्या संधीचा चांगला फायदा
नागरिकांनी घ्यावा असे आवाहन चेअरमन सौ. आशादेवी रामचंद्र जगताप यांनी केले आहे