मंगळवेढा:मंगळवेढा पंढरपूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार माननीय समाधान दादा अवताडे यांच्या ४७ व्या वाढदिवसानिमित्त आमदार समाधान दादा अवताडे जनसंपर्क कार्यालय मध्ये भव्य रक्तदान शिबिराच्या आयोजन केले गेले होते.
या भव्य रक्तदान शिबिरामध्ये तब्बल ७४७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक हित जतन केले.
या रक्तदान कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विष्णुपंत आवताडे यांच्या शुभहस्ते स्व.महादेवजी आवताडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
समाजाचे हित राखत कार्यसम्राट आमदार समाधान दादा आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास भेट देऊन अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासना करिता सहभाग नोंदवला.
त्यानंतर वाढदिवसानिमित्त सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी काही नाव नोंदणी करून या विवाह सोहळ्यामध्ये आपला विवाह करण्याचे ठरविले आहे.
तसेच आमदार समाधान दादा अवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त पशुवैद्यकीय विभागामार्फत पशू आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून अनेक पशूंची तपासणी व उपचार करण्यात आले.
त्यावेळी माजी पं.स.सदस्य नवनाथ पवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ अवताडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर,दत्तात्रय कुलकर्णी,धनंजय पाटील,अंबादास कुलकर्णी,भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण,सचिन शिवशरण,सुरेश भाकरे, मा. उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे,राजेंद्र सुरवसे,विद्यमान संचालक तानाजी काकडे,जगन्नाथ रेवे,भारत निकम,भारत आटकले,युवराज शिंदे,सरपंच विनायक यादव,समाधान हेंबाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध गावचे सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,विकास सोसायटीचे चेअरमन, आवताडे शुगर्स चे कर्मचारी,हितचिंतक, कार्यकर्ते व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.