मंगळवेढा:मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी शहर व तालुका यांनी दिनांक 11/10/2023 रोजी मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब,मा.राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री. जयंत पाटील व पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे प्रतिनिधी अभिजीत (आबा) पाटील व राहुल शहा शेठजी यांचे नेतृत्व स्वीकारून आज मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विविध पश्नावर मा.उपविभागीय अधिकारी,मंगळवेढा, मा.मुख्याधिकारी नगरपरिषद मंगळवेढा,मा. उपअभियंता,बांधकाम विभाग मंगळवेढा यांचेकडे आगामी होणाऱ्या नवरात्र महोत्सवाचे करीता मिरवणूक मार्गावर स्वच्छता करणे,रस्त्यावर असलेले खड्डे बुजवणे, सांगोला रोड ते एकवीरा देवी मार्गावर लाईट दुरूस्त करणे, रोडलगत ची झाडेझुडपे तोडणे तसेच सध्या सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी यांचा भिजत असलेला दूध दर कमी होत असलेचा प्रमुख प्रश्न व यावर ठोस उपाय व्हावा अशा विविध मागण्याचे निवेदन देऊन योग्य पुर्तता करणेकरीता सर्व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केली.
यावेळी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा कार्याध्यक्ष मुजम्मील काझी, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, तालुका उपाध्यक्ष संतोष रंदवे, जमीर इनामदार, श्री विठ्ठल सहकारी साखर माजी संचालक रायाप्पा हळणवर, शहर उपाध्यक्ष वैभव ठेंगील, सचिन वडतिले, रामभाऊ दोलतोडे, सुहास मुरडे आदी उपस्थित होते.