मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी मंगळवेढा ते अंतरावाली-सराटी सायकल प्रवास. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ११ ऑक्टोबर, २०२३

मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी मंगळवेढा ते अंतरावाली-सराटी सायकल प्रवास.

 


            मंगळवेढा: मराठा आरक्षणासाठी उपोषण करून क्रांती घडवून आणण्याचे काम करणारे मराठा योद्धा म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी केले.क्रांतीची मशाल धगधगत राहावी या साठी दि.१४ ऑक्टोबर रोजी आंतरवाली सराटी या ठिकाणी त्यांची विराट सभा आयोजित केली आहे.

                    या सभेला साठी मंगळवेढा येथील 2 युवक सायकल वरती जाऊन त्या ठिकाणी सभेत सहभागी होणार आहेत.

                    मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ गावी अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या सभेसाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष,वारी परिवाराचे सदस्य प्रा.विनायक कलुबर्मे व सिद्धेश्वर डोंगरे सायकल वरती 300 किलोमीटर प्रवास करत सभा ठिकाणी जाणार आहेत.सर्वसाधारणपणे दररोज शंभर किमी प्रवास ते करणार आहेत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ५० टक्क्यांच्या आत आरक्षण मिळावे, ही मनोज जरांगे-पाटील आणि असंख्य समाज बांधवांची मागणी आहे. 


                 या मागणीसाठीच त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात महासभेचे आयोजन केलेले आहे महाराष्ट्रातून विविध भागातून मराठा बांधव या सभेसाठी लाखोंच्या संख्येने येणार आहेत मंगळवेढ्यातील या दोन युवकांनी सायकल वरती 300 किमी प्रवास करून त्या सभेसाठी पाठिंबा दर्शवणार आहेत याचे सर्व मराठा बांधवातून कौतुक होत आहे.


आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आता नाही तर कधीच नाही मराठा आरक्षणाची ही शेवटचीच लढाई ठरावी यासाठी आपण सायकल वरती प्रवास करत सभेला जायचे ठरवले आहे- प्रा विनायक कलुबर्मे 

        या विराट सभेसाठी त्यांनी मोठ्ठ्या प्रमाणात विविध जिल्ह्यामधे,गावामध्ये सभा घेऊन त्यांनी विराट सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

        त्याच सभेसाठी मंगळवेढा येथील दोन युवक ३०० किलोमीटर चा सायकल प्रवास करणार आहेत.

     आज पहाटे ६ वाजल्यापासून त्यांनी प्रवासास सुरुवात केली आहे.ते 3 दिवसात प्रवास पूर्ण करणार आहेत अशी माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिली.तर छत्रपती संभाजी राजे चौकामध्ये या दोन सायकल स्वरांचे स्वागत सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येणार असून पुष्पगुच्छ व मनाचा फेटा देऊन सन्मान करण्यात येणार आहे.



test banner