ॲग्रीकॉस एक्सपोर्टस् कडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राहटेवाडी येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ४ ऑक्टोबर, २०२३

ॲग्रीकॉस एक्सपोर्टस् कडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राहटेवाडी येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.




                 मंगळवेढा: मंगळवेढा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहटेवाडी येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.


                   भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती २ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते. स्वातंत्र्यासाठी यानी केलेल्या कठोर संघर्षाचे स्मरण केले जाते. या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व आहे. ज्या असंख्य व्यक्तींनी भारत मुक्तीसाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण केले जाते. भारताच्या स्वातंत्र्याचा प्रवास अहिंसक प्रतिकार, बौद्धिक पराक्रम आणि विविध लोकसंख्येमध्ये खोलवर रुजलेली एकतेची भावना याद्वारे वैशिष्ट्यपूर्ण आहे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणाऱ्या ऐतिहासिक घटना नेते आणि तत्त्वे आणि स्वातंत्र्याची भावना राष्ट्राच्या अस्मितेला आकार देण्यासाठी संपूर्ण भारतभर हा दिवस साजरा करण्यात येतो.


           


     शाळेचे मुख्याध्यापक राजेश घोडके, सरपंच  लक्ष्मण धसाडे, उपसरपंच नवनाथ  पवार, अध्यक्ष अंकुश पवार, उपाध्यक्ष अनिल पवार सहशिक्षक राजेश घोडके गुरुजी व शिक्षिका सुनंदा पवळ मॅडम व शालेय विदयार्थी उपस्थित होते. प्रथम ॲग्रीकॉस एक्सपोर्टस् चे संचालक अजय आदाटे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. नंतर शाळेतील छोट्या मुलांनी गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित भाषणे केली.

              कार्यक्रमावेळी बोलताना अजय आदाटे म्हणाले की, भारतातील माणसे एकमेकांना भेटले की राम-राम म्हणतात ही संकल्पना खूप जुन्या पुरातन काळापासून चालत आली आहे तसेच आता महात्मा गांधीजींच्यावर गोळ्या झाडल्यानंतर त्यांचे शेवटचे शब्द सुद्धा हे राम होते अशा पद्धतीने राम हा जनमानसात महात्मा गांधींनी रुजवण्याचा प्रयत्न केलाय.

             महात्मा गांधींनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेवून भारतात पहिला सत्याग्रह केला. भारतातील चंपारण्य (बिहार) भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महात्मा गांधी यांनी केलेला यशस्वी सत्याग्रह.


            महात्मा गांधींनी अहिंसक मार्गाने सत्याग्रह करण्याचे धडे त्यांच्या आई पुतळाबाई यांच्याकडून घेतले, ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला आणि आईन्स्टाईन यांच्यासारखे जागतिक दिग्गज असलेले महापुरुष हे सुद्धा महात्मा गांधींना मानणारा वर्गामधीलच एक होते.

          जगामध्ये महात्मा गांधींसारखा हाडामासाचा माणूस हा असू शकतो यावर भविष्यात कोणाचाही विश्वास बसणार नाही हे तर शब्द आईन्स्टाईनचे महात्मा गांधी बद्दल होते.

           लालबहादूर शास्त्री यांच्या डोक्यावर टोपी दिसते ती गांधीजींना प्रेरित होऊनच त्यांनी आपल्या अहिंसक मार्गाचा अवलंब करण्यासाठी घातलेली होती.

        पाटील सर नी कार्यक्रम संपन्न करण्यासाठी परिश्रम घेतले.


test banner