राज्यमंत्री मंडळ बैठकीत विविध निर्णय व दिवाळीत मिळणार १०० रुपयात आनंदाचाद शिधा - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ४ ऑक्टोबर, २०२३

राज्यमंत्री मंडळ बैठकीत विविध निर्णय व दिवाळीत मिळणार १०० रुपयात आनंदाचाद शिधा

            

                 


                       महाराष्ट्र :मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.त्यावेळी दिवाळी निमित्त शिधापत्रिका धारकांना शंभर रुपयांत शिधा वाटप करण्याचा व विविध विभागांमध्ये निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये अपलासंख्याक,विधी व न्याय, अन्न व नागरी पुरवठा,गृह विभाग,ऊर्जा अश्या विविध विभागांमध्ये निर्णय घेण्यात आले.

                त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

       बैठकी मध्ये विविध निर्णय घेण्यात आले त्यामधे ....

               दिवाळीनिमित्त शिधापत्रिका धारकांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे.आता त्यामधे मैदा आणि पोह्याचा ही समावेश करण्यात येणार आहे.

                 यामध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता विविध योजना. त्यामध्ये अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती योजना. त्यामध्ये दरवर्षी 27 लाख विद्यार्थ्यांना लाभ मिळणार.


                 विधी व न्याय विभागा मध्ये नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करणार.विविध ४५ पदांनाही मंजुरी देण्यात आली.

                 गृहविभागा मध्ये इमारतीच्या पूनर्विकासाला वेग येणार.विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कसनाबाबत अधिनियम सुधारणा.

                  ऊर्जा विभागामध्ये विदर्भ,मराठवाड्यातील कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार.उच्च दाब प्रणाली योजनेला मदत वाढ देण्यात आली.

                  या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री आजित पवार अनुपस्थित होते. याबाबत मुख्यमंत्री यांना विचारले असता ते म्हणाले की अजित पवार यांची तब्येत ठीक नसल्याने ते आज बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.


test banner