मंगळवेढयात मराठा आरक्षणाच्या जनजागृतीसाठी भव्य मशाल क्रांती मोर्चाचे आयोजन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०२३

मंगळवेढयात मराठा आरक्षणाच्या जनजागृतीसाठी भव्य मशाल क्रांती मोर्चाचे आयोजन.

    


                     मंगळवेढा:सकल मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या अंतरवाली सराटी ता अंबड जि जालना येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ व मराठा आरक्षण लढ्याच्या जनजागृतीसाठी मंगळवेढ्यात 28 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य मशाल क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

                 दामाजी चौकातून निघणारा मशाल मोर्चा दत्तू गल्ली,ढगे गल्ली,चेळेकर गल्ली,चोखामेळा चौक,मुरलीधर चौक,रतनचंद शहा बॅंकेसमोरून चोखामेळा चौक,शिवप्रेमी चौक,दामाजी चौक येथे येऊन समारोप होणार आहे.मराठा समाजाच्या प्रत्येक कुटुंबातील सदस्य या लढ्यामध्ये शांततेच्या मार्गाने आरक्षणाच्या साखळी उपोषणात सहभागी व्हावा यासाठी सदर मोर्चा काढण्यात येणार आहे.

     


           दि २६ पासून मंगळवेढा शहरात नियोजित केलेल्या रूपरेषेनुसार साखळी उपोषण सुरू आहे. याअगोदर शासनाच्या आरक्षण देण्याच्या उदासिनतेबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी माचणूर गावातील ग्रामस्थांनी मशाल मोर्चा काढला होता तरी हक्काचे आरक्षण मिळविण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी मंगळवेढ्यातील मराठा समाज नेहमीच पुढे राहिलेला आहे.म्हणूनच मशाल मोर्चासाठी कुटूंबासहीत मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाज मंगळवेढा तालुक्याच्या वतीने करण्यात आले.


test banner