स्व.प्रदीप (बंडू) लाळे यांचे स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, १० ऑक्टोबर, २०२३

स्व.प्रदीप (बंडू) लाळे यांचे स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.
                 मंगळवेढा:सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक स्व. प्रदीप(बंडू) लाळे यांच्या पंचविसाव्या स्मृतिदिनानिमित्त रविवार दि.8 ऑक्टबर रोजी सकाळी 11 वाजता समता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था,किल्ला भाग मंगळवेढा यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

                या शिबिराचे उद्घाटन श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांचे हस्ते करण्यात आले.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगळवेढा तालुका सूतगिरणीचे चेअरमन दत्तात्रय लाळे, पक्ष नेते अजित जगताप,दामाजी शुगर्सचे गौरीशंकर बुरकुल,प्रतीक किल्लेदार,बाबा कोंडुभैरी,समता बँकेचे चेअरमन अशोक माळी यांच्या उपस्थिती रक्तदान घेण्यात आले.

                या वेळी 45 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला.या रक्तदान शिबिरास रेवणील ब्लड बँक सांगोला यांचे सहकार्य लाभले.test banner