मंगळवेढा:मंगळवेढा येथील सप्तशृंगी नवरात्र महोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी शामराव तुकाराम जठार यांची निवड करण्यात आली. यावर्षी मंडळाचे ३३ वे वर्षे असून सप्तशृंगी देवीच्या मंदिरामध्ये झालेल्या बैठकीमध्ये जठार यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी उपाध्यक्षपदी सुखदेव अंबादास डांगे,सचिव शरद पांडुरंग रूपनर तर ज्योतप्रमुख म्हणून ऋतुराज भगत व ओम खटकळे यांची निवड करण्यात आली. यावेळी मंडळाचे माजी अध्यक्ष शंकर गांडुळे, दत्तात्रय जावळे,शरद हेंबाडे, दिलीप वाडेकर,नंदकुमार गायकवाड,विनायक कलुबर्मे,मधुकर भगत,पांडुरंग नकाते,सिद्धेश्वर डोंगरे,महादेव खटकळे, शिवाजी जगदाळे,दामोदर जठार,महादेव गांडुळे आदीजण उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.