स्वच्छता ही सेवा या उपक्रमात संत दामाजी महाविद्यालयाने सार्वजनिक परिसर केला चकाचक. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १ ऑक्टोबर, २०२३

स्वच्छता ही सेवा या उपक्रमात संत दामाजी महाविद्यालयाने सार्वजनिक परिसर केला चकाचक.


             


        मंगळवेढा- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता ही सेवा या शासनाच्या महत्वकांक्षी उपक्रमात श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ विभाग राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दिनांक १ अॅाक्टोंबर रोजी सकाळी ९:३० ते १०:३० या वेळेत शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिम राबवून राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

                यावेळी मंगळवेढा शहरातील शिवप्रेमी चौकातील भाजी मंडई तसेच छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याच्या नियोजित जागेतील प्लास्टिक पिशव्या,काचेच्या बाटल्या गोळा करून गवत काढून संपूर्ण परिसर चकाचक करण्यात आला. श्री संत दामाजी महाविद्यालयाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सदरची स्वच्छता अभियान राबवून खरोखरच गांधीजींना आदरांजली वाहिली आहे.


             सध्या मंगळवेढा शहरातील मलेरिया व डेंग्यू या रोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता दामाजी महाविद्यालयाने मात्र स्वच्छता मोहिम राबवून स्वच्छतेचा संदेशच दिला आहे.तसेच मागील आठवड्यातही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवेढा बसस्थानक व आगाराची स्वच्छता करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे महत्त्वाचे कार्य केले होते.

           


     स्वच्छता ही सेवा या उपक्रमात यावेळी संस्थेचे सचिव किसनराव गवळी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन बी पवार,उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे,पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड यांचेसह वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका,कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला सदर स्वच्छता मोहिम राबविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ दत्तात्रय गायकवाड,डॉ राजेश गावकरे कनिष्ठ विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा शैलेंद्र मंगळवेढेकर यांनी परिश्रम घेतले.

test banner