मंगळवेढा:मंगळवेढा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार दिनांक ५ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ४.३० वाजता मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी मनोज जरांगे पाटील हे मार्गदर्शन करणार असून सदरची सभा आठवडा बाजार,शिवप्रेमी चौक,मंगळवेढा येथे होणार आहे.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा ठरलेला आहे.या दौऱ्यात समाज बांधवांनी सहभागी व्हावे,असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय जाधव यांनी केले.
ते पुढे बोलताना म्हणाले की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ५० टक्के च्या आत आरक्षण मिळावे ही मनोज जरांगे- पाटील आणि असंख्य मराठा बांधवांची मागणी आहे.या मागणी साठी त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात उपोषण केले.
अंतरवली सराटी येथे समाज बांधवांच्या वतीने १४ ऑक्टोबर रोजी मोठ्ठी जाहीर सभा होणार आहे.
असा असणार जरांगे पाटील यांचा दौरा......
दि.5 ऑक्टोबर रोजी दुपारी दीड ते दोन वाजता सोलापूर मध्ये आगमन होणार,4.30 ते 5 वाजता मंगळवेढा,आणि सायंकाळी 7 वाजता पंढरपूर
6 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता बार्शी येथे गाठीभेटी घेऊन धाराशिव कडे रवाना होतील असे जाधव यांनी सांगितले.