मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा,जो पर्यंत जी.आर.येत नाही तोपर्यंत आंदोलन थांबनार नाही,आणि या गोष्टीचा करणार त्याग. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा,जो पर्यंत जी.आर.येत नाही तोपर्यंत आंदोलन थांबनार नाही,आणि या गोष्टीचा करणार त्याग.

     


       

                 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


      पण यानंतर आता मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांडे यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे.

                    आरक्षणाचा जी.आर. केंव्हा घेऊन येताय याची वाट पाहतो.पण,जी.आर.नाही आला तर हे आंदोलन थांबनार नाही.तर आजपासून पाण्याचा पण त्याग करणार,पाणी सुटलं म्हणून समजा असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.


       मनोज जरांगे- पाटील पुढे म्हणाले की,राज्य सरकारचे प्रतिनिधी येऊन निर्णय देऊ अस सांगतात.इथून पुढे येताना राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी जी.आर.घेऊनच यावा. बैठका आणि चर्चेतून काही निष्पन्न होत नाही.

                   आत्ता पर्यंत खूप चर्चा झाली आहे.सरकारने मराठा आरक्षणावर वरती निर्णय घेतला असावा,अस मला वाटत आहे.तुम्ही पहिल्या गोष्टी पाढे पुन्हा सांगू नका.

                          मराठा आरक्षण साठी आंदोलन करणाऱ्या


आंदोलकांवर गंभीर स्वरूपातील दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. सरकारच्या प्रतिनिधींना केवळ दोन दिवसांचा वेळ दिला होता.आता एक दिवस शिल्लक राहिला आहे.मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार तेंव्हाच थांबणार, असे जरांगे- पाटील म्हणाले.

        मराठा आरक्षणाचा जी.आर.केव्हा घेऊन येतात,याची वाट पाहतो.पण,जी.आर. नाही आला तर आंदोलन थांबणार नाही.तर उद्यापासून पाण्याचा ही त्याग करणार.

                  राज्यसरकारने 100% चांगला निर्णय घेतला असेल.नाही आला तर आंदोलन थांबणार नाही.ज्यांनी तुमच्या आईला मारले त्यांना कायमचे बडतर्फ करा.आम्ही मर्डर करणाऱ्याची जमात नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बिन बुडाच्या आरोप करत आहेत. आमचा दहशतवादाचा कॅम्प नाही किंवा हातात कोणत्या हत्यार नाही खून करण्याच्या उद्देशाने उद्देशाने आम्ही काही बाहेर पडत नाही असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.


         पुढे बोलताना जरांगे पाटील असेही म्हणाले आम्ही स्वतः जीवावर आंदोलन करतो राजकारणाच्या जीवावर आंदोलन करत नाही.

                   ज्या दिवशी मराठा समाजाला आरक्षण मिळेल त्या दिवशीच मी थांबणार. कर्ज अधिकृत शिष्ट मंडळ येईल शिस्त मंडळ आल्यानंतर सर्वजण बसून पुढचा निर्णय घेऊ परवा आम्ही आंदोलने दिशा ठरवणार आहे त्यासाठी मोठी प्रेस कॉन्फरन्स घेऊ असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.


test banner