मंगळवेढा:जालना येथील घटनेच्या निषेधार्थ प्रकाश मुळीक यांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण प्रांत कार्यालयासमोर करण्यात आले.
जालना येथील घटनेवर संपूर्ण महाराष्ट्र पेटला परंतु रस्ता रोको आणि बंद करून दोन-चार पोलिसांना घरी बसवून हे वादळ शांत झाले तर मराठा बांधवांना माता-माऊल्यांना आपण न्याय मिळवून दिला असे म्हणायचे का मग ज्यांनी अत्याचार करायला पोलिसांना भाग पाडले त्या गृहमंत्र्यांची कोणतीच चूक नव्हती असे म्हणायचे का लाखोंच्या मोर्चानंतर लागोपाठ 58 मोर्चे महाराष्ट्रात निघाले आणि जगाचे लक्ष वेधले एका जालना जिल्ह्यातील आंतरावली सराटी येथील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, मराठा समाजाचा एक सदस्य म्हणून मी आज मंगळवेढा प्रांत कार्यालय येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करत आहे.
अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी सतीश दत्तू,दिलीप जाधव,विठ्ठल यादव,ज्ञानेश्वर कलूबरमे,त्रिंबक चव्हाण, अतुल मुंडे, विशाल खटकळे समाधान हेंबाडे, राहुल घुले,सुदर्शन ढगे,स्वप्नील फुगारे,अभिजीत शिंदे, इसाक शेख,देवदत्त पवार,चंद्रकांत पवार,दत्तात्रय हजारे,ज्ञानेश्वर कोंडूभैरी ,चंद्रकांत चेळेकर