मंगळवेढ्यात मराठा आरक्षण प्रश्नी सरकारचा तिसरा घालून चक्का जाम आंदोलन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

मंगळवेढ्यात मराठा आरक्षण प्रश्नी सरकारचा तिसरा घालून चक्का जाम आंदोलन.


                          
         

         मंगळवेढा:मंगळवेढ्यात मराठा आरक्षणप्रश्नी सुरू असलेल्या आंदोलनात रविवारी सोलापूर रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करत सरकारचा निषेध केला.

याच वेळी संत दामाजी चौकात असलेल्या मंडपासमोर केलेल्या सरकारच्या प्रतिकात्मक दहन विधीचा तिसरा दिवस करण्यात आला यावेळी चक्क कावळ्याने घास शिवला.


                   दरम्यान विविध संघटनेचे पाठिंबा पत्र देण्यात आले यामध्ये मेडिकल असोसिएशन व कोळी समाजाने मराठा आरक्षण मागणीला पाठिंबा दिला.सकाळी 11 वाजता मंगळवेढा सोलापूर रस्त्यावरील जुन्या टोल नाक्याजवळ सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी चक्काजाम केला यावेळी तासभर वाहतूक ठप्प झाली होती. याप्रसंगी येताळा भगत यांनी सरकारचे आरक्षण देण्याची मानसिकता दिसत नसून केंद्रात व राज्यात एकाच विचाराचे सरकार असून देखील अद्याप आरक्षण प्रश्न तोडगा काढला नाही.


                 यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष सरकार करत असून यापेक्षा तीव्र आंदोलन राज्यभर उभे करावे लागणार आहे सरकारने मागून घेतलेल्या मुदतीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर चाल ढकल न करता महिन्याभरात तोडगा काढावा अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल असा इशारा दिला यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कोंडूभैरी यांनी मराठा आरक्षण प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाची फसवणूक केली जात आहे.आरक्षण देण्याची मानसिकता दिसत नसल्यामुळे संघर्ष अटळ आहे असे सांगितले.यावेळी सतीश दत्तू,राहुल सावजी, संभाजी घुले,शिवाजी वाकडे, विठ्ठल गायकवाड,आनंद मुढे, प्रकाश मुळीक,सुखदेव डोरले,युवराज घुले,मारुती वाकडे,राहुल घुले,अनिल मुदगुल,विजय हजारे, दत्तात्रय भोसले, स्वप्निल फुगारे,भगवान चव्हाण आदी उपस्थित होते.

               मंगळवेढ्यातील आंदोलन आमदार समाधान आवताडे दिलेल्या आश्वासनानुसार स्थगित करण्यात आलेले आहे पुढील आंदोलन मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार 40 दिवसानंतर आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल.


test banner