मराठा आंदोलनात 117 जनांचे रक्तदान व रक्तरंजित सह्याचे अंगठे. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३

मराठा आंदोलनात 117 जनांचे रक्तदान व रक्तरंजित सह्याचे अंगठे.



               मंगळवेढा:मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनात आज रक्तरंजित सह्याचे अंगठे व 117 बांधवानी रक्तदान करून मराठा आरक्षणाची मागणीची तीव्रता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आल्या दरम्यान येथील आंदोलनाला डॉक्टर असोसिएशन व  मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पाठिंबाचे पत्र देण्यात आले.


                 दामाजी चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला शहरातील इतर जातीधरर्मीयाचा देखील पाठिंबा मिळत आहे. यापूर्वी शहर बंद, रास्ता रोको, सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा, मुंडन व अर्धनग्न आंदोलन केल्यानंतर आज दामाजी चौक येथे रक्तदान शिबिर करून सकल मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी रक्तरंजित अंगठे करून तो कागद सरकारला पाठवण्यात येणार आहे.


          तब्बल 117 बांधवांनी रक्तदान करून अनोख्या आंदोलन करत मराठा आंदोलनाचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याचा दृष्टीने सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.


             यावेळी डॉ सुनील जाधव, डॉ संदेश पडवळ, डॉ अभिजीत हजारे, डॉ.दशरथ फरकंडे,डॉ नितीन आसबे, डॉ.नितीन क्षीरसागर, डॉ.विवेक निकम,डाॅ.अतुल निकम, डॉ देवदत्त पवार,डॉ  युवराज पवार, डॉ.रविंद्र गायकवाड ,डॉ प्रशांत नकाते, डॉ.सुभाष देशमुख ,डॉ.अतुल भालके,डॉ.सदानंद माने, डॉ.पंडीत गोरे,राहुल सावजी संभाजी घुले, सतीश दत्तू, ज्ञानेश्वर कोंडूभैरी, शिवाजी वाकडे,आनंद मुडे, प्रकाश मुळीक, सुखदेव डोरले,प्रा.येताळा भगत, युवराज घुले,मारुती वाकडे,अॅड राहुल घुले,अनिल मुदगुल,विजय हजारे, भगवान चव्हाण,आदी उपस्थित होते.


            तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका अध्यक्ष प्रशांत साळे यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या सहीनिशी पाठिंबाचे पत्र सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द केले. 


test banner