पंढरपूर: संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आसणार्या विठ्ठल मंदिरात दररोज असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात याच मंदिर परिसरात हार व इतर साहित्य विक्री करून आपला उदरनिर्वाह करणारे अनेक तरूण ,महिला ,वयोवृद्ध तसेच अनेक दिव्यांग व्यक्ती ही स्वःताचा स्वाभिमान जपून आशा लहान स्वरूपात वस्तूंची विक्री दिवसभर करून ,आपला प्रपंच ,उदरनिर्वाह गेली अनेक वर्ष करताना दिसून येतात .
मागील 10-11 वर्ष पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे स्व.आमदार भारत नाना भालके हे यांचा प्रत्येक सुख-दु:खात खंबीर पणे उभे राहिले होते , वेळ प्रसंगी प्रशासनाचा विरोधात जाऊन स्वःता वरती केसेस ही घेतल्या होत्या भारत नानांचा निधनानंतर मात्र या व्यवसायिका मध्ये पोरखेपणाची भावना निर्माण झाली आहे व ही भावना त्यांनी माध्यमातून बोलून ही दाखिवली आहे.
भारत नानांचा तोच विचारांचा वारसा पुढे घेऊन जात भारत नाना भालके फाऊंडेशनचा संचालिका सौ.डॉ.प्रणिता भगिरथ भालके यांनी काल उपविभागीय पोलीस अधिकारी व पंढरपूर न.पा.चे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन दोन दिवसात योग्य तो मार्ग काढावा गरज लागल्यास व्यापारी तसेच आम्ही ही उपस्थित राहु आसे निवेदन दिले आहे .