महात्मा फुले यांनी धर्माच्या आधारे होणारे शोषण उघड केले: डॉ.दत्ता सरगर
मंगळवेढा (प्रतिनिधी)म.फुले यांनी वर्णव्यवस्था,जातीव्यवस्था सतीप्रथा,विधवा पुनर्विवाह प्रतिबंध शिक्षण बंदी, हिंदू धर्मातील विविध देवदेवता,शनीची साडेसाती, फल ज्योतिष,अस्पृशता,शूद्र वर्णाची निर्मिती, वेदांचे स्वरूप अशा हिंदू धर्मातील अनेक घटकांची चिकित्सा करून या घटकांच्या आधारे केले जाणारे धार्मिक,आर्थिक, सामाजिक शारीरिक बौद्धिक आणि शैक्षणिक शोषण मांडले असे प्रतिपादन डॉ. दत्ता सरगर यांनी केले.ते मंगळवेढा नगरपालिकेने आयोजित केलेल्या म.फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सोमनाथ सरवदे,(O.S.) हे होते.
डॉ.सरगर पुढे म्हणाले की हिंदू धर्माला आधुनिक स्वरूप द्यावे. हिंदू धर्मातील अन्यायी चाली, रुढी, प्रथा,परंपरा नष्ट व्हाव्यात, समाज विज्ञानवादी,चिकित्सक बुद्धिवादी व्हावा या दृष्टीने फुले यांनी चिकित्सा केली. फुले यांनी केवळ हिंदू धर्माची चिकित्सा केली नाही तर मुस्लिम, ख्रिस्ती या धर्मातील अनेक शोषणकारी प्रथांचे स्वरूप सांगून त्याच्या पाठीमागील शोषण स्पष्ट केले. धर्म हे केवळ धार्मिक आणि अध्यात्मिक आधारावर उभे नसतात तर त्याचा पाया हा आर्थिक असतो. वंचितांनाही स्वतःचा इतिहास असतो हे त्यांनी आपल्या चिकित्सेद्वारे सिद्ध केले.स्त्री-पुरुष समानता हे तत्व फुलांच्या चिकित्सेचा पाय आहे.फुले यांच्या चिकित्सेमुळे स्त्रीवादी शेतकरी,कामगार ,शैक्षणिक चिकित्सात्मक लेखन करणाऱ्याच्या चळवळी आणि परंपरा निर्माण झाल्या. कार्यक्रमाचे सुरुवातीस प्रास्ताविक करताना प्रकाश मुळीक यांनी उत्तर पेशवाईतील सामाजिक स्थिती काय होती याची मांडणी केली. छत्रपती शिवराय व म.फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. या कार्यक्रमासाठी संजय दौंडे (आरोग्य निरीक्षक), प्रकाश मुळीक, अभिजीत शिंदे, विठ्ठल यादव, दिलीप मुढे, नागा राजमाने, गोरख काकडे, हनुमान गडेकर, हरी देवकर, बाबासाहेब पवार, तेजस सूर्यवंशी, विठ्ठल कांबळे, नितेश रणखांबे, अमोल वस्त्रे, सुभाष नकाते, सोमनाथ ताड, तुकाराम गोवे, गणपत माळी, शंकर वस्त्रे, युनूस मोगल, सतीश जाधव,दिनेश रजपूत, माने, खवतोडे, इंगळे. यासह इतर कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राम पवार यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी दत्ता सरगर यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल नगरपालिकेच्यावतीने शाल, फेटा आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.