मराठा नागरी सहकारी पतपुरवठा संस्था मर्यादित मंगळवेढा तालुका जिल्हा सोलापूर, या संस्थेच्या थकीत कर्जदार/जामीनदार सभासद बंधू भगिनींना नम्र आवाहन आपण संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची अद्याप परतफेड केलेली नसल्याने कर्जाची थकबाकी सतत वाढत गेलेली आहे. त्यामुळे अनेक गोरगरीब शेतकरी, कष्टकरी ठेवीदार सभासद बंधू भगिनींच्या आपल्या संस्थेत ठेवलेल्या ठेवी संस्थेकडून मुदतीत त्यांच्या गरजेच्या वेळी परत करणे शक्य झाले नाही. हि बाब संस्थेसाठी व संस्थेच्या थकित कर्जदार व जामीनदारांच्या दृष्टीने भूषणावह नाही.
तथापि संचालक मंडळाने मयत कर्जदार सभासदाकडील थकबाकी वसुलीसाठी त्यांच्या जामीदारांना व वारसांना दिलासा देणेकरिता संस्था अर्थिक अडचणीत असतानाही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मयत कर्जदाराचे जामीनदार/वारसदार यांनी मुद्दल अधिक मुद्दला एवढेच व्याज म्हणजे दामदुप्पट रक्कम ३० जून २०२३ पर्यंत पूर्णपणे भरल्यास सदर कर्ज खाते बेबाक/ कर्जमुक्त करण्यात येणार आहे.
तसेच इतर थकीत कर्जदार/जामीदारासाठी द.सा.द.शे १४% व्याजाचे दराने मुद्दल रकमेवर सरळ व्याजाने कर्जाची पूर्णपणे परतफेड होईपर्यंत आकारणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तरी या संधीचा थकीत कर्जदार/जामीदार यांनी लाभ घेऊन तात्काळ संस्थेच्या थकीत कर्जातून मुक्त व्हावे.
जे कर्जदार/जामीनदार नोटीस मिळूनही वरील प्रमाणे कर्जाची तात्काळ परतफेड करणार नाहीत, त्यांचेवर मे. न्यायालयात थकबाकी वसुली साठी महाराष्ट्र सहकारी संस्थाअधिनियम,१९६० कलम ९१ / १०१ अन्वये दावे दाखल करून थकबाकी व्याजासह व खर्चासह वसूल केली जाईल. त्यामुळे होणारे परिणामास संबंधित थकीत कर्जदार/जामीनदार हेच जबाबदार राहतील. याची गंभीर दखल घ्यावी...
सर्व सामान्य गोरगरीब जनतेच्या ठेवी आहेत याची जाणीव थकित कर्जदार व जामीनदार यांनी ठेवून तात्काळ आपल्या कडील थकीत कर्जाची व्याजासह परतफेड करुन संस्थेस सहकार्य करावे.
हि नम्रतेची विनंती..
श्री. अजय सुरवसे श्री. चंद्रकांत काकडे श्री. रामचंद्र शिंदे
सचिव व्हा.चेअरमन चेअरमन
मा.सर्व संचालक मंडळ
...............................................................