आवताडे शुगर्सच्या गळीत हंगामाची तयारी सुरू! ऊसतोडणी व वाहतूक ठेकेदारांच्या वाहनांची करार नोंदणी अंतिम टप्प्यात! - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

आवताडे शुगर्सच्या गळीत हंगामाची तयारी सुरू! ऊसतोडणी व वाहतूक ठेकेदारांच्या वाहनांची करार नोंदणी अंतिम टप्प्यात!

 


मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा तालुक्यातील फॅबटेक उद्योग समूहाच्या ताब्यातील साखर कारखाना आवताडे शुगर ऑण्ड डिस्टिलरीज  प्रा. ली यांनी नुकताच रीतसर ताबा मिळवला असून येणाऱ्या गळीत हंगामाची तयारी सुरू केली असून त्यासाठी वाहन कराराला सुरुवात केली असल्याची माहिती आवताडे शुगर्स चे अध्यक्ष संजय आवताडे यांनी दिली आहे.
चालू गळीत हंगामासाठी कराराचे पूजन झालेनंतर 51 करार झाले असून येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात प्रत्यक्षात कारखाना सुरू करण्याचा निर्धार केला आहे.

आवताडे शुगर ऑण्ड डिस्टिलरीज  प्रा. ली साखर कारखानाच्या व्यवस्थापनाकडून २०२२-२३ मधील गळीत हंगामाच्या तयारीला वेग घेतला असून आजपासून ऊसतोडणी व वाहतूक ठेकेदारांना वाहनांची करार नोंदणी केली जात आहे.
बहुतांश कामगार कामावर रुजू झाले असून, सर्व बाजूने कामकाजाला वेग आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ऊसतोड मजुरांचा करार व अंतिम मसुदा तयार करत साखळी पद्धतीने एकमेकांना जामीन राहत ऊसतोडणी व वाहतूक ठेकेदार यांच्याशी करार केले जात आहे.

यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक मोहन पिसे, शेतकी विभागातील रमेश पवार, वाहन मालक आनंद मुळवाड, प्रकाश माने, बाबासाहेब माने, बंडू हाके, भीमाशंकर वडीयार, कात्राळ कर्जाळ चे माजी उपसरपंच जकाप्पा नरुटे, शेतकी कर्मचारी उपस्थित होते.

test banner